मोदी सरकारला झटका, फरार चोक्सी फिरायला मोकळा; ‘त्या’ नोटीसीतून वगळले नाव

मोदी सरकारला झटका, फरार चोक्सी फिरायला मोकळा; ‘त्या’ नोटीसीतून वगळले नाव

PNB Scam : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) आता जगात कुठेही प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. इंटपोलने आपल्या रेड कॉर्नर नोटीसमधून चोकसीचे नाव वगळले आहे. हा निर्णय भारत सरकारसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. सरकारने चोक्सीचे नाव या नोटीसीतून हटविण्याला विरोध केला होता.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, इंटरपोलने ही कारवाई चोकसीने दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर केली आहे. ज्यामध्ये त्याने भारत सरकारकडून सुरू असलेली कायदेशीर प्रक्रियेला राजनितिक षडयंत्र म्हटले होते. दुसरीकडे काँग्रेसने या मुद्द्यावर मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर विरोकांचा आवाज दाबण्यासाठी करते. मात्र त्याचवेळी चोक्सीसारख्यांना दिलासा देण्याचे काम याच सरकारकडून  केले जात आहे.

वाचा : PNB Scam Case मधील महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर 

चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेत (PNB Scam) जवळपास तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. भारतीय बँकिंग इतिहासात हा सर्वात मोठा घोटाळा गणला जात आहे. हा घोटाळा उघडकीस येण्याआधीच नीरव आणि चोक्सी भारतातून पळून गेले होते. नीरव सध्या ब्रिटेनमध्ये अटकेत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चोक्सी सध्या एंटिगुआ आणि बार्बाडोस येथे आहे. त्यालाही परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चोक्सीने घोटाळा उघडकीस येण्याआधीच 2017 मध्ये एंटिगुआची नागरिकता घेतली आहे.

रेड नोटीस म्हणजे काय ?

इंटरपोल जगातील 195 देशांची संघटना आहे. या देशातील कायदेविषयक संस्था या संघटनेशी जोडलेल्या  आहेत. या संस्था एखाद्या व्यक्तीचे प्रत्यर्पण, शरणागती किंवा अन्य कायदेशीर कारवाईसाठी आरोपी विरोधात वॉन्टेड नोटीस जारी करू शकतात. त्यामुळे हा आरोपी कुठेही असला तरी तेथील कायदेयंत्रणा त्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतील. या अलर्टनंतर ज्या देशात आरोपी असेल त्या देशाला अलर्ट जारी करणाऱ्या देशाबरोबर कायदेविषयक प्रक्रियेत सहकार्य करावे लागते.

Kirit Somaiya : विरोधकांचे घोटाळे काढणाऱ्या किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा

सीबीआय कारवाई म्हणजे षडयंत्र – चोक्सी 

चोक्सीचे नाव डिसेंबर 2018 मध्ये इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये समाविष्ट केले गेले होते. सीबीआयच्या आग्रहाखातर भारत सरकारने ही कार्यवाही केली होती. चोक्सीने फ्रान्समधील इंटरपोलच्या मुख्यालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत चोक्सीने नोटीसीला आव्हान दिले होते. चोक्सीने आपल्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआय तपासाला एक राजनितिक षडयंत्र असल्याचे म्हटले होते. भारतातील जेलची अवस्था, आपले आरोग्य तसेच सुरक्षा हे मुद्देही चोक्सीने याचिकेत उपस्थित केले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube