राघव चढ्ढा यांची भाजपसोबत जडजोड; पंजाबचे मुख्यमंत्री मान यांचा खळबळजनक दावा

गेल्या काही वर्षांपासून तुम्ही घाबरू लागला आहात, तुम्ही सरकारविरोधात बोलायला घाबरता असा मान यांनी आरोप केलाय.

News Photo   2026 04 03T193710.116

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान (Aap) यांनी त्यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मान यांनी राघव चड्ढा यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे असा थेट आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर जर पक्षाने राज्यसभेत काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलण्याचा निर्णय घेतला, पण एखादा नेता कॅन्टीनमधील समोशांच्या किमतीवर बोलला, तर असं वाटते की तो नेता वेगळ्याच भूमिकेतून बोलत आहे. अशा परिस्थितीत पक्ष त्या नेत्यावर कारवाई करतो असंही मान यांनी स्पष्ट केलं.

आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली आहे आणि त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांचे नाव प्रस्तावित केलं आहे. याबाबतच्या समोर आलेल्या माहितीनुसार पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात, चड्ढा यांना सभागृहात बोलण्यासाठी आप’च्या निर्धारित कोट्यातून वेळ देऊ नये अशी विनंतीही या पत्रात केली आहे. चड्ढा हे पंजाबचे राज्यसभा सदस्य आहेत. एकेकाळी ते ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते.

आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना येणार का?, चढ्ढाला 400 कोटी दिल्याने वडेट्टीवार संतप्त

या सगळ्यात, आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज म्हणाले, गुजरातमध्ये भाजप पोलिसांनी आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. यावर खासदार चढ्ढा सभा सभागृहात काही बोलले का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच, पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा हक्क काढून घेतला जात आहे. जेव्हा सभागृहात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला, तेव्हा हे चढ्ढा त्यावर सही करण्यास नकार देता, जेव्हा पक्ष सभागृहातून सदस्य सभात्याग करतात तेव्हाही हे बाहेर पडले नाहीत असंही ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांपासून तुम्ही घाबरू लागला आहात, तुम्ही सरकारविरोधात बोलायला घाबरता. तुम्ही देशाच्या खऱ्या समस्यांवर बोलायला घाबरता, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान , या सगळ्यात राघव चड्ढा यांनी आपला आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, ‘आम आदमी पार्टीने राज्यसभेला राघव चड्ढा यांना बोलण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पण ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपला काढत राहतील. आपल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले, माझा आवाज दाबला गेला आहे, पण मी हारलेलो नाही असंही ते म्हणाले.

follow us