काँग्रेस नेते राहुल गांधी आज बंगळुरू न्यायालयात हजर; काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी आज बंगळुरू न्यायालयात हजर; काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर

Rahul Gandhi Today Present In Bangalore Court : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी आज बंगळुरू येथे कोर्टात हजर राहणार आहेत. कर्नाटक प्रदेश भाजपने मानहानीची तक्रार दिल्यानंतर कोर्टाकडून राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. (Bangalore Court ) आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास राहुल गांधी बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. (Rahul Gandhi) त्यानंतर ते प्रदेश कांग्रेस कार्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, विमानतळावर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी राहुल यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना जामीन राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार

कर्नाटक विधानसभा निवडणूक सुरू असताना एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी प्रदेश भाजपचे सरकार कमिशन घेऊन काम करत आहे असा थेट आरोप केला होता. तसंच, तशा आशयाच्या जाहीराती वर्तमानपत्रात छापूनही आल्या होत्या. त्यामुळे आमची प्रतिमा मलिन केली. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असा आरोप करत कर्नाटक प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती. दरम्यान, यामध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना जामीन मिळालेला आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह भाजप नेत्यांविरोधात खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप करत भाजपने मानहानीचा खटला दाखल केला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, भाजपने आपल्या तक्रारीत सर्व सार्वजनिक कामांमध्ये 40 टक्के कमिशन घेतल्याचा आरोप करत काँग्रेने मागील सरकारच्या विरोधात भ्रष्टाचार दर कार्ड प्रकाशित केलं होतं. तसंच, राहुल गांध यांनी एक्स (ट्विटर)वरही ही जाहीरात पोस्ट केली होती असंही या तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणात 1 जून रोजी बंगळुरू न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. त्यावेळी दोघांनीही कोर्टात हजेरी लावली होती. दरम्यान, या दोघांना जामीन देताना कोर्टाने न्यायमुर्ती के.एन शिवकुमार यांनी राहुल गांधींना 7 जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार राहुल गांधी आज सुमारे साडेदहा वाजता कोर्टात हजर होणार आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज