धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद; शिक्षण व्यवस्था, मोदी, शाह आणि RSS वर टीका

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर स्पष्ट आणि दृश्यमान कारवाई झाली पाहिजे. या घटनेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे.

News Photo   2026 07 25T192026.000

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील 10, जनपथ येथे पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले. तसेच विद्यार्थ्यांची माफी मागण्याचे आवाहनही पंतप्रधानांना केले.

राहुल गांधी म्हणाले, “सर्वप्रथम ही देशातील विद्यार्थ्यांची विजय आहे. तेच भारताचे भविष्य आहेत. एकेकाळी जगभरात भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा गौरव केला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत या व्यवस्थेवर सातत्याने आघात करण्यात आला. तिचे खासगीकरण करण्यात आले आणि ती कमकुवत करण्यात आली. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेची झालेली दुर्दशा आणि अयोग्य कारभार यांचे प्रतीक होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा अपेक्षितच होता. मात्र केवळ मंत्री बदलून चालणार नाही, शिक्षण व्यवस्थेत ठोस बदल करावे लागतील.”

यावेळी राहुल गांधी यांनी RSS वरही निशाणा साधला. 

ज्ञानव्यवस्थेवरही हल्ला करण्यात आला आहे. या परिस्थितीत मोठे आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र सध्याचे सरकार ते करू शकेल, असे मला वाटत नाही,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच नव्हे तर पेललेट गनचाही वापर करण्यात आला. “विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर स्पष्ट आणि दृश्यमान कारवाई झाली पाहिजे. या घटनेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणातील मुख्य जबाबदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

follow us