काँग्रेसचा प्लॅन फेल! ‘त्या’ वादानंतर सचिन पायलट यांनी केली मोठी घोषणा

काँग्रेसचा प्लॅन फेल! ‘त्या’ वादानंतर सचिन पायलट यांनी केली मोठी घोषणा

Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील (Rajasthan Politics) दोन दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद मिटविण्याचे प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वाद मिटल्याची जी घोषणा करण्यात आली होती त्यावर पाणी पडले आहे. सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच मौन तोडत स्पष्ट केले की मी मागण्यांवर ठाम आहे.

पायलट यांनी गेहलोत सरकारला याआधीच पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केल्याने आगामी काळात गेहलोत यांच्याविरोधात राजकीय लढाईचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, हे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी पीएम मोदी राजस्थानात निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी आले होते. म

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक

पायलट यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्यापासून नवीन महिना सुरू होईल. मी परत सांगत आहे मी युवकांना जी काही आश्वासने दिली आहेत त्या काही हवेतील गप्पा नाहीत. काँग्रेस पक्ष नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात राहिला आहे. युवकांना न्याय देणे आणि भाजप सरकारच्या काळात जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करणे अनिवार्य आहे. यावर कोणतीच तडजोड केली जाऊ शकत नाही.

याआधी या दोन्ही नेत्यांतील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठका झाल्या. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढण्याचीही घोषणा करण्यात आली. आधी गेहलोत यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट घेतली त्यानंतर पायलट यांनी खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या उपस्थितीत जाहीर केले की आगामी निवडणुका एकत्र लढल्या जातील. मात्र, त्यांनी दोघांतील वादावर काय तोडगा काढला याचा खुलासा केला नाही.

“PM मोदी देवालाही शिकवतील की…”; अमेरिकेतून राहुल गांधींनी डागली तोफ

पायलट यांच्या मागण्या काय?

जयपूर येथे आपल्या पाच दिवसांच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप करताना पायलट यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गेहलोत सरकारवर निशाणा साधला. राजस्थान लोकसेवा आयोगाला समाप्त करावे, त्याचे पुनर्गठण करावे, सरकारी परीक्षेत पेपर लीक झाल्यामुळे प्रभावित झालेल्या युवकांना नुकसान भरपाई आणि मागील भाजप सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी अशा सचिन पायलट यांच्या मागण्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube