राज्यसभेत ‘आप’चे नेते म्हणून राघव चड्ढांना संधी नाही, सभापतींनी फेटाळली केजरीवालांची विनंती
Jagdeep Dhankhar : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी ‘आप’ला आज मोठा धक्का दिला आहे. राघव चड्ढा यांची राज्यसभेत आप नेतेपदी नियुक्ती करण्याची आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची विनंती फेटाळली आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यासाठी ‘आप’ने पत्र पाठवले होते.
राम मंदिर सोहळ्याला सोनिया गांधी जाणार? काँग्रेसकडून सस्पेन्स कायम…
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती धनखड यांना पत्र लिहिले होते. संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील, असे त्यात म्हटले होते. दरम्यान, धनखड यांनी केजरीवाल यांना पत्र लिहिले. धनखड यांनी पत्रात म्हटले आहे की, हा पैलू पक्षांचे नेते, गटांचे प्रमुख कायदा 1998 अंतर्गत संसदेत मान्यताप्राप्त नियमांच्या अधीन आहे. आपली विनंती कायदेशीर प्रक्रियेनुसार नाही. त्यामुळे ती मान्य केली जात नाही. त्यांनी संजय सिंह हेच वरिष्ठ सभागृहात आपचे नेते राहतील, असं सांगितलं.
अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा लग्नाबाबत मोठा खुलासा; म्हणाली, ‘कोणी विचारले तर..’
आप राज्यसभेतील चौथा सर्वात मोठा पक्ष
आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण 10 सदस्य आहेत. भाजप, काँग्रेस आणि टीएमसीनंतर सदस्यसंख्येच्या बाबतीत हा देशातील चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राघव चढ्ढा यांनी नुकतीच अध्यक्षांची माफी मागितली आहे. त्यांनंतर त्यांचे निलंबनही रद्द करण्यात आले होते. राघव चढ्ढा हे राज्यसभेचे सर्वात तरुण सदस्य आहेत.
पत्रात काय केली होती मागणी?
राज्यसभा अध्यक्षांना पक्षप्रमुख यांनी पत्र लिहिलं होत. त्यात आम आदमी पार्टीच्यावतीने संजय सिंह यांच्याऐवजी राघव चढ्ढा यांना राज्यसभेत सभागृह नेते बनवण्याची विनंती केली होती. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय सिंग यांना ईडीने ५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते बनवण्यास सांगितले होते. त्यासंदर्भात त्यांनी राज्यसभा सचिवालयाला पत्रही लिहिलं होतं. मात्र, आम आदमी पक्षाने केलेली विनंती धनखड यांनी मान्य केली नाही.