राम रहीमला पुन्हा पॅरोल, ‘इतक्या’ दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार
Ram Rahim Gets Parole : बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Ram Rahim) पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार आहे. राम रहीमला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात 21 दिवस घालवणार आहे. डेरा प्रमुखासोबत (Dera Sacha Sauda) त्याचा दत्तक मुलगा हरिप्रीतही येण्याची शक्यता आहे. फर्लो मिळाल्यानंतर त्याच्या अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आश्रमात त्याच्या आगमनाची तयारीही सुरू झाली आहे.
दुसरीकडे, राम रहीमच्या बाहेर येण्याला पुढील वर्षी हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशीही जोडले जात आहे. डेरा सच्चा सौदा आश्रमाचे प्रवक्ते जितेंद्र खुराना यांनी सांगितले की, त्याना 21 दिवसांची फर्लो मंजूर झाल्याचीही माहिती माध्यमांकडून मिळाली आहे.
Raymond चे चेअरमन 32 वर्षांनी पत्नीपासून विभक्त; तब्बल 75 टक्के संपत्ती देण्याची केली मागणी
राम रहीम पाचव्यांदा बाहेर येतोय
डेरा प्रमुख गुरमीत सिंगला पहिल्यांदा 17 जून 2022 रोजी 30 दिवसांसाठी पॅरोल मिळाला होता. यानंतर तो बर्णवा आश्रमात राहिला. 18 जुलै रोजी पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला. 88 दिवसांनंतर त्याला 15 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला. 25 नोव्हेंबर रोजी तो पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला.
21 जानेवारी 2023 रोजी गुरमीत सिंग तिसऱ्यांदा 40 दिवसांच्या पॅरोलवर बर्नावा आश्रमात आला होता. 3 मार्च रोजी पॅरोल संपल्यानंतर तो पुन्हा सुनारिया कारागृहात गेला. चौथ्यांदा डेरा प्रमुख 30 दिवसांच्या पॅरोलवर 20 जुलै रोजी बर्नवा आश्रमात पोहोचला. त्यानंतर तो तुरुंगात गेला.
Traffic Rules: रजनीकांतच्या नातवाने रस्त्यावर असं काही केलं की वाहतूक पोलिसाने ठोठावला दंड
प्रति केसमध्ये रोहतक तुरुंगात शिक्षा भोगतोय
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंग रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बलात्काराच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे. यावेळी डेरा प्रमुखाच्या तुरुंगातून बाहेर येण्यामागेही राजकीय कारण असल्याचे बोलले जाते. कारण पुढील वर्षी हरियाणात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळेच फर्लोच्या मंजुरीला हरियाणा विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे.