Ramdas Athwale Poem : विरोध करना है कॉंग्रेस का फैशन, रामदास आठलेंचे कवितेतून कॉंग्रेसला चिमटे

  • Written By: Published:
Ramdas Athwale Poem : विरोध करना है कॉंग्रेस का फैशन, रामदास आठलेंचे कवितेतून कॉंग्रेसला चिमटे

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. कार्यक्रम स्थानिक असो अथवा संसदेच्या सभागृहातील भाषण. रामदास आठवलेंच्या कविता ठरलेल्याच. आजही संसदेच्या सभागृहात कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत रामदास आठवलेंनी टाळ्या मिळवल्या.

सध्या संसदेतअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाषण केलं आहे. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेचे अनुभव सांगत केंद्र सरकारच्याबद्दल लोकांच्या मनात काय सुरू आहे, याचे काही उदाहरणं देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये संपूर्ण देशात फक्त उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्याच नावाची चर्चा सुरू असल्याचा टोला लगावत त्यांचे आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध काय आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी करत अदाणी हेच प्रत्येक व्यवसायात कसेकाय घुसतात असा सवालही केला आहे. राहुल यांनी मोदी आणि अदानी यांचा जुना फोटो दाखवत, दोघांमध्ये नाते काय असा सवाल उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. यावर भाजपकडून देखील जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते .दरम्यान, या तापलेल्या वातावरणात आता रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी कविता सादर केली आहे. या त्यांच्या कवितेनंतर संसदेत एकच हशा पिकला होता.

राज्यसभेत आज चर्चेदरम्यान रामदास आठवले (Ramdas Athwale) यांना बोलण्याची संधी मिळाली होती. यावेळी आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या दाढीवर निशाणा साधत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या या कवितेची संसदेत एकच चर्चा रंगली आहे.

Balasaheb Thorat : नाराजी नाट्यानंतर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार! 

रामदास आठवलेंची संपुर्ण कविता-
राष्ट्रपति जी का अभिभाषण, मजबूत करेगा भारत नेशन,
विरोध करना है कांग्रेस का फैशन, इसलिए मैं विरोध में कर रहा भाषण,
कांग्रेस वालो, जितनी बढ़ानी है उतनी बढ़ाओ दाढ़ी,
लेकिन मोदी जी की है बहुत ही मजबूत बॉडी,
मोदीजी को मालूम है देश के तमाम लोगों की नाड़ी,
फिर कांग्रेस की कैसे चलेगी उनके सामने गाड़ी,
मोदी जी आदमी हैं खास, इसलिए उनके साथ है रामदास,
मोदीजी को है विकास की है आस, इसलिए वो राजनीति में हो गए हैं पास.

कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube