Balasaheb Thorat : नाराजी नाट्यानंतर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार!
पुणे : राज्यातील काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) प्रकरणावरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात नाराजी नाट्य सुरु आहे. त्यातून नाराज होऊन थोरात यांनी पक्षश्रेष्टींना पत्र तसेच आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाही दिली आहे. मात्र, असे असले तरी कसबा पेठ पोटनिवडणुकीत बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याचे सुत्रांची माहिती आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये रंगलेल्या राजकारणानंतर थोरात यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नुकतेच बाळासाहे थोरात यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी स्ष्टपणे मी पक्षाच्या पातळीवर भूमिका मांडणार आहे. त्या प्रमाणे त्यांनी पटोले यांच्याबाबत पक्षश्रेष्टींना पत्र पाठवून केली आहे. पुढील आठवड्यात या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीनीची बैठक होईल. त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत बाळसाहेब थोरात यांची पुढील आठवड्यात कसबा पेठ मतदार संघात सभा होणार आहे. त्यामुळे नाराजी असली तरी ती पक्षीय पातळीवर आहे. मात्र, उमेदवारासाठी ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल, असे सांगितले जात आहे. त्यांची पुण्यात सभा होणार असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.