Breaking : RBI चा मोठा निर्णय; दोन हजारांची नोट चलनातून हद्दपार

Breaking : RBI चा मोठा निर्णय; दोन हजारांची नोट चलनातून हद्दपार

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटांची छपाई थांबवली असून या दोन हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. आरबीयाने सांगितले की, 30 सप्टेंबर 2023 नंतर 2 हजारांच्या नोटा बंद होणार आहेत. नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने 3 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळं सध्या दोन हजाराच्या नोटा चलनात वापरता येणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0

2000 च्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने 2000 च्या नोटा बंद होणार नाहीत, असे सातत्याने सांगितले जात होते. दरम्यान, आरबीआयने मोठा निर्णय घेतला. आता 2000 रुपयांच्या नोटा छापल्या जाणार नाहीत, असे आरबीआयने म्हटले आहे.

IPL : एक विजय अन् एक पराभव… : मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी RCB च्या भरवश्यावर

आरबीयाने सांगितले की, तुमच्याकडे दोन हजाराच्या नोटा असतील तर तुम्हाला बँकेत जाऊन त्या बदलून घ्याव्या लागतील. आरबीआयने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात जारी केलंय. त्यात सांगितले की, 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्यात आली आहे. मात्र, ३० सप्टेंबर ही नोट चलनात राहणार आहे. सध्या बाजारात असलेल्या 2हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. 2019 पासून 2000 च्या नोटा चलनात कमी दिसत होत्या. दरम्यान, आता आरबीआयने दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. आरबीआने बँकांना या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बॅंकेत जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. फक्त वीस हजार रुपयांच्या नोटा एकदा बदलल्या जातील, असं आरबीआयने सांगितले. त्यासाठी बॅंकाना विशेष खिडकी उघडावी लागेल. दरम्यान, आता RBI 2000 रुपयांच्या जागी एक हजाराच्या नोटा चलनात आणेल का, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube