Dhan Rate: धान पिकाला हंगामाच्या सुरुवातीलाच विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

  • Written By: Published:
Dhan Rate: धान पिकाला हंगामाच्या सुरुवातीलाच विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Dhan Rate  : शेतकऱ्यांसाठी कायम निर्यात बंदी, धानाच्या भावात चढउतार होत राहिल्याने शेतकरी वर्ग कायम चिंतेत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच, शेतीमालाला भाव मिळवा यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचंही आपण पाहिलं आहे. (Dhan Rate) चार वर्षापूर्वी दिल्लीत शेती मालाला हमीभाव, कायदे मागं घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत मोठं आंदोल झालं त्याचा परिणाम म्हणून ते कायदे मागं घेण्यात आले. परंतु, वारंवार हमीभावाची मागणी होत असते.

मागच्या वर्षी धानाला विक्रमी ३,३०० रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. जागतिक बाजारपेठेतील परिणामामुळं यंदा हंगामाच्या सुरुवातीला हे दर कोसळणार, अशी भीती व्यक्त होत होती. पण केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे २,७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. हे दर येत्या दिवसांत आणखी वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 15.62 कोटीच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्यात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. कोकणातही धानाचे अधिक उत्पादन होते. साधारणत: साधारण (ठोकळ) आणि फाइन (बारीक) अशा दोन पद्धतीच्या धानाची लागवड होते. ठोकळ धानापासून तयार होणारा तांदूळ परदेशात अधिक विक्री होतो. देशांतर्गत बाजारात नॉन बासमती ए ग्रेड (बारीक) तांदळाची विक्री होते. २०२३च्या हंगामात धानाचे दर गतीने वाढले. या दरवाढीने शेतकरी सुखावला असतानाच यंदा धानाचे उत्पादन अधिक होत आहे.

यातच सुरुवात विक्रमी दराने झाल्याने हे दर अधिक वाढत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान आणि थायलंडमधील निर्यात धोरणानंतर याची व्याप्ती स्पष्ट होणार असली तरी आत्ताच दर अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. अधिक भाववाढीच्या आशेने शेतकरी धान घरात भरून ठेवत असल्याचे दिलासादायी चित्र दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या