‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’ घोषणा सत्यात…
‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’, ही घोषणा आता सत्यात उतरलीय, होय छत्रपती संभाजीनगरच्या भीमसैनिकांनी हे करुन दाखवलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे.
Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे…
तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती संभाजीनगर महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिलीय. शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तत्काळ मदत देणार
यंदाची डॉ. आंबेडकरांची जयंतीत काहीतरी वेगळा उपक्रम करुन साजरी करण्याच राजू शिंदेंनी ठरवलं होतं. त्यानूसार त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यास अर्ज केला. हा अर्ज शिंदे यांनी अमेरिकेतल्या अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ संस्थेत केला होता. त्यासाठी त्यांनी भारतीय चलनानूसार नोंदणीसाठीचे शुल्कही भरले.
खुशखबर ! 10 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी ठाणे महानगरपालिकेत भरती जाहिर, महिन्यला 20 हजार रुपये पगार
शिंदे यांनी 9 फेब्रुवारीला हा अर्ज केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ताऱ्याची रजिस्ट्रेशन झाल्याचं प्रमाणपत्र नूकतंच त्यांना मिळालंय. रजिस्टर केलेल्या ताऱ्याचं लॉंचिंग 14 एप्रिल रोजी करणअयात येणार असून स्पेस रजिस्ट्री अॅपच्या संकेस्थळावरुन हा तारा पाहता येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना हा तारा पाहायचा असेल तर मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार आहे.
चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना खुलं आव्हान, कोल्हापुरात देखील…
दरम्यान, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’ अशी घोषण कायमच आंबेडकरी समाजाकडून देण्यात येत असते. विशेषत: डॉ. आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळीही ही घोषणा देण्यात आली होती. हीच घोषणा राजू शिंदेंनी आज प्रत्यक्षात उतरवून बाबासाहेबांचं नाव ताऱ्यावर कोरलंय.
एकंदरीत असं कोणालाही ताऱ्याला नाव देता येत नसून ताऱ्याला नाव देणाऱ्या व्यक्तीच कार्य मोठं असायला हवं, त्यानूसार संस्थेकडून नावाची पडताळणी देखील केली जाते. अखेर दीड महिन्यापासून अथक परिश्रमानंतर कागदपत्रांची पूर्तता झाली. त्यानंतर आकाशातील तार्याला ‘बाबासाहेबांचं’ नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे म्हणाले.