Sanchar Saathi Portal : आता मोबाईल हरवल्यास चिंता नाही, केंद्र सरकारने लाँच केले खास पोर्टल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T163704.817

Sanchar Saathi Portal :  17 मे या दिवशी जगभरात जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो आणि यानिमित्ताने आज केंद्र सरकारकडून संचारसाथी हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. तर apple च्या find my phone प्रमाणेच आता तुम्ही या पोर्टल द्वारे तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन शोधता येईल. सध्या मोबाईल ट्रेसिंगची यंत्रणा फक्त दिल्ली आणि मुंबईतच उपलब्ध होती मात्र आता ही प्रणाली या पोर्टल द्वारे अख्या देशात लागू केली जाणार आहे.

पोर्टल लॉन्चिंग वेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोर्टलच्या माध्यमातून महत्त्वाच्या तीन गोष्टी साध्य केल्या जाणार आहेत हे सांगितलं.

तरी या तीन गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात.

अंमलबजावणी एजन्सी आणि टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधेल पोर्टल :  संचारसाथी पोर्टलचा पहिला टप्पा, पहिली सुविधा म्हणजे CEIR म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा आहे. तुमचा मोबाईल हरवला असेल तर तुम्ही या पोर्टलला भेट देऊ शकता. त्यानंतर पोर्टल काही ओळख पडताळणी करून लगेचच पोर्टल कायदा अंमलबजावणी संस्था आणि टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधेल आणि तुमचा हरवलेला फोन याद्वारे ब्लॉक करण्यात येईल.

आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी आनंदाची बातमी! ‘या’ योजनेला मंजुरी

या पोर्टल अंतर्गत देण्यात येणारी दुसरी सुविधा म्हणजे know your mobile म्हणजेच KYM अशी आहे :  याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलची कनेक्शन चौकशी करता येणारे. आता कनेक्शन चौकशी म्हणजे काय तर युजरला त्याचा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करण्यास आणि त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स आहेत याची आकडेवारी तपासण्यासाठी मदत होणारे. यात जर तुम्हाला काही चुकीचा प्रकार आढळला तर ते तुम्हाला सहज ब्लॉक सुद्धा करता येणारे.

तर या पोर्टल अंतर्गत दिली जाणारी तिसरी सुविधा ही लीकॉम सीम ग्राहक व्हेरिफिकेशन आहे : मोबाईल फसवणूक आणि सिम संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते. फ्रॉड सिम आणि मोबाईलमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असून ऑनलाईन फसवणूकी  सारख्या कामांमध्ये त्याचा वापर करण्यात येतोय. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्युशन लाँच करण्यात आले. यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी मध्ये IMEI आधारित फोन चोरी, सूचना, संदेश, यांसारख्या फीचर्स चा समावेश होतो. याशिवाय मोबाईल खरेदी करताना तोच आहे IMEI नंबर पूर्वी यूज झाला असेल तर संचार साथी या पोर्टल द्वारे युजर्स ला सूचित करता येणार आहे.

The Kerala Story: “खरे नाव बदलावे लागले…” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

संचारसाथी पोर्टल चे फायदे

सरकारच्या आकडेवारीनुसार संचारसाठी पोर्टलचा वापर करून आत्तापर्यंत चाळीस लाखांहून अधिक फसव्या कनेक्शनची ओळख पटली आहे तर आत्तापर्यंत 36 लाखांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहे. यामुळे ओळख चोरी, बनावट केवायसी, मोबाईल उपकरणांची चोरी, बँकिंग फसवणूक, इत्यादींपासून युजर्सना  संरक्षण मिळणार आहे. https://sancharsathi.gov.in या वेबसाईटवर तुम्ही या नवीन सेवांचा लाभ घेऊ शकता.

Tags

follow us