राहुल गांधींची राऊतांकडून पाठराखण; लोकसभेतील फ्लाइंग KISS म्हणजे द्वेषावरील उतारा
Sanjay Raut On Rahul Gandhi Flying Kiss : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी काल (दि. 9) लोकसभेत दिलेल्या फ्लाइंग किसमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या अनेक महिला खासदारांकडून याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारदेखील दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून राहुल गांधींची पाठराखण करण्यात आली आहे. लोकसभेतील राहुल गांधींचा फ्लाइंग किस म्हणजे द्वेषावर उतारा असल्याचे म्हटले आहे. तसेच तो प्रेमाचा किस होता असेही राऊतांकडून सांगत राहुल गांधींच्या कृतीचे समर्थन करण्यात आले आहे.
आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण
राऊत म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणात महोब्बतचे दुकान सुरू केले आहे. त्याचाच हा एक भाग असून, लोकसभेतील राहुल गांधींचा किस हा प्रेमाचा किस होता. यावेळी त्यांनी मणिपूर मुद्द्यावरून भाजपसह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
मोदी मणिपूर मुद्द्यावरून काहीही बोलण्यास तयार नसून, त्यांनी त्यावर भाष्य केले असते तर, आज आम्हाला अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची वेळ आली नसती असेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केले. मणिपूरचा मुद्दा काश्मीरपेक्षा गंभीर होईल, सरकारने लक्ष घालावे, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला. यावेळी राऊतांनी पाचोरा येथे पत्रकाराला करण्यात आलेल्या मारहाणीवरही भाष्य केले. सातत्याने पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे राज्याची वाटचाल मणिपूरच्या दिशेने चालल्याचे उदाहरण आहे.
हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त
लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से
लोकसभेत राहुल गांधी वादग्रस्त कृती करण्याची ही पहिली वेळ नसून, याआधी राहुल गांधींनी PM मोदींना दिलेल्या जादुच्या झप्पीमुळे ते चर्चेत आले होते. 2018 च्या सुरुवातीला पावसाळी अधिवेशनात राहुल गांधींनी सहकारी खासदाराकडे बघून डोळा मारल्यामुळे तसेच सभागृहातच पंतप्रधान मोदींना मिठी मारल्याबद्दल वादात सापडले होते.
PM मोदींनी भर सभागृहात जादुची झप्पी
2018 मध्येही विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावातील चर्चेदरम्यानही राहुल गांधींनी भाषण करत माझ्या बोलण्यात तथ्य आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी माझ्याशी नजरेला नजर मिळवण्यास टाळत असल्याचे म्हटले होते. तसेच यावेळी काँग्रसचा खरा अर्थ समजावून सांगितल्याबद्दल राहुल गांधींनी भाजप आणि RSS चे आभार मानले होते. यानंतर रहुल गांधी थेट उठून मोदींजवळ पोहोचले आणि त्यांना घट्ट मिठी मारत जादु की झप्पी दिली होती.
#WATCH Rahul Gandhi walked up to PM Narendra Modi in Lok Sabha and gave him a hug, earlier today #NoConfidenceMotion pic.twitter.com/fTgyjE2LTt
— ANI (@ANI) July 20, 2018
ज्योतिरादित्य सिंधियांना मारला डोळा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्यानंतर राहुल गांधी पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसले. यावेळी त्यांनी शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे बघत डोळा मारला त्यावेळी सिंधिया काँग्रेसमध्ये होते.