Shraddha Walkar case : आफताबवर आरोप निश्चित, 1 जूनपासून सुनावणी…

Shraddha Walkar case : आफताबवर आरोप निश्चित, 1 जूनपासून सुनावणी…

Shraddha Walkar case : बहुचर्चित श्रद्धा वालकर (Shradha walkar) हत्यांकाड प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. येत्या 1 जूनपासून या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आफताब पूनावालावर पोलिसांकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आरोपाखाली आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकानं धाडली ममता बॅनर्जींना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

मागील वर्षी 18 मे रोजी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली होती. हत्या करुन आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन दक्षिण दिल्लीच्या मेहरौली भागातील घरात तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून आफताबने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतल्या एका जंगलात फेकून दिले होते.

‘The Kerala Story’ निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

आता या प्रकरणाची सुनावणी सुरु करण्यात येणार आहे. आफताबने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावत खटल्याला सामोरे जाणार असल्याचं सांगितलंय. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे) या गुन्ह्यासाठी प्रथम आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला जात असल्याचं अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी सांगितल होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारी रोजी 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी दिल्लीच्या विशेष सत्र न्यायालयात 1 जून पासून सुरू होणार आहे. या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा होईल, अशी आशा श्रद्धा वालकरच्या वडिलांनी, विकास वालकरांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube