पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार; 15 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार; 15 जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात आज पंचायत निवडणुका (Panchayat Elections) पार पडल्या. या निवडणुकीत मतदानादरम्यान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून राज्यात निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात आज दुपारपर्यंत तब्बल 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Stone pelting and violence in West Bengal s panchayat elections over 15 dead)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

पश्चिम बंगाल राज्यातील पंचायत निवडणुकीसाठी आज (ता. 8) सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानादरम्यान हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या. या हिंसाचारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की यामध्ये तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) पाच, भारतीय जनता पक्ष (भाजप) पाच, डावे आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक आणि अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आणि दोन मतदान केंद्रांवर मतपेट्यांची तोडफोड करण्यात आली, असे एका न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत हिंसाचाराच्या घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.



पोस्टल बॅलेट अनेक भागात लुटले

काही भागातील मतपेट्यांची नासधूस आणि मतदारांना धमकावल्याचेही वृत्त आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा येथील बारविता सरकारी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतपेट्या फोडण्यात आल्या आणि मतपत्रिका जाळण्यात आल्या.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! वंदे भारतसह सर्व AC रेल्वेच्या भाड्यात 25 टक्के कपात 

केंद्राने हस्तक्षेप करावा

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारावर भाजपने सांगितले की, राज्यपालांनी राजीव सिंजा यांची नियुक्ती करून सर्वात मोठी चूक केली. आतापर्यंत 15 हून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यांना टीएमसीच्या गुंडांनी मारले आहे. केंद्राने कलम 355 किंवा 356 अंतर्गत हस्तक्षेप करावा. आम्हाला संविधानाच्या संरक्षकांकडून कारवाई हवी आहे, पश्चिम बंगाल एलओपी आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ही मागणी केली.

राज्यपालांकडून पाहणी
राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी उत्तर 24 परगणामधील विविध भागांना भेटी दिल्या, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. ते उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बराकपूरमधील बासुदेबपूर गावात गेले. येथे ग्रामस्थांनी राज्यपालांच्या ताफ्याला घेराव घातला. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. मतांच्या नावावर फसवणूक सुरू असून तुम्हीच बघा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube