सरन्यायाधीशांनी घेतली वकिलाची फिरकी, म्हणाले… तोपर्यंत येऊ नका

Untitled Design   2023 05 08T145316.512

Supreme Court CJI DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (8 मे) रोजी सरन्यायाधीशांच्या कोर्टात एक रंजक घटना घडली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाची चांगलीच फिरकी घेतली. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयात येऊ नका, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संबंधित वकिलाला सांगितले. दरम्यान न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व उन्हाळी सुट्ट्या यांच्या अनुषंगाने न्यायाधीशांनी हे वक्तव्य केले होते.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, खरंतर कोर्टात उन्हाळ्याच्या सुट्ट्या होणार आहेत. अशा स्थितीत एका वकिलाने सरन्यायाधीशांकडे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी सुट्टीपूर्वीची तारीख मागितली. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हंटले, न्यायालयातील न्यायाधीशांची कमतरता आणि वेळेचा दाखला देत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणाची सुनावणी करू शकत नाही, असे सांगितले.

संबंधित वकिलाला सीजेआय चंद्रचूड म्हणाले, कृपया आमची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करा. दोन न्यायाधीश निवृत्त होत आहेत. हा शेवटचा आठवडा आहे. जोपर्यंत कोणाची फाशीची शिक्षा बजावली जात नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या आठवड्यात ते ऐकू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, मी हे वारंवार सांगू इच्छितो, आज आमच्याकडे 237 प्रकरणे सुनावणीसाठी आहेत. जेव्हा एखादी मोठी आणीबाणी असते तेव्हाच एखादी बाब नमूद करावी अशी माझी विनंती आहे, असे न्यायाधीश म्हणाले.

सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त आणखी एक न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्यासमोरही असेच प्रकरण आले होते. एका वकिलाने विशिष्ट तारखेला या प्रकरणाचा उल्लेख केल्यावर, न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले, “सरन्यायाधीशांनी आधीच सूचित केले आहे की गेल्या आठवड्यात नवीन प्रकरणे येतील. जर तुम्हाला शेवटच्या आठवड्यात विशिष्ट तारीख हवी असेल तर कोर्ट मास्टरशी बोला. अशा प्रकारे आम्ही काम करू शकणार नाही.

आगामी निवडणुकांबाबत ओवेसींनी केली मोठी घोषणा…अशी असणार रणनीती

सर्वोच्च न्यायालय वर्षभरात एवढे दिवस काम करते
चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एका वर्षात 200 दिवस (सुमारे साडेसहा महिने) काम करतात. तर यूएस सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश केवळ 80 दिवस काम करतात. ऑस्ट्रेलियाचे सर्वोच्च न्यायालय देखील 100 दिवसांपेक्षा कमी काम करते. त्याच वेळी, ब्रिटन आणि सिंगापूरचे सर्वोच्च न्यायालय 145 दिवस काम करते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube