संविधानिक पदावरून अशी भाषा? सोफिया कुरेशींविषयी संतापजनक विधान करणाऱ्या शाहांना CJI गवईंनी फटकारलं

संविधानिक पदावरून अशी भाषा? सोफिया कुरेशींविषयी संतापजनक विधान करणाऱ्या शाहांना CJI गवईंनी फटकारलं

Supreme Court on Vijay Shah : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शा (Vijay Shah) यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. शाह यांनी कुरेशी यांचा उल्लेख दहशदवाद्यांची बहिण असा केला. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शाह यांना फटकारले आहे.

Operation Sindoor : सौदीतच ठरला ‘इस बार बडा करेंगें’ चा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्… 

आज झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice Bhushan Gavai) यांनी संविधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकतो, असा थेट सवाल केला.

शाह यांनी कर्नल कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि डीजीपींना शाह यांच्याविरुद्ध चार तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी संध्याकाळी शाह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. याला शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी मंत्री शाह यांची खरडपट्टी काढली. सरन्यायाधीश म्हणाले, तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणत्या प्रकारचे विधान करत आहात? मंत्री असल्याने कसंही बोलणार का? ही कोणती भाषा आहे? असली वक्तव्ये मंत्र्याला शोभतात का?संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य करू कसं शकतो, अशा शब्दात सरन्यायाधीश गवई यांनी फटकारल. तसंच पदावर असल्याने जबाबदारीने विधाने करावी, असंही म्हटलं.

पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत राजनाथ सिंहांचं मोठं विधान; पाकिस्तानची झोप उडणार 

शाह यांच्या वतीने वकील विभा दत्ता मखीजा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी म्हटलं की, याचिकाकर्त्याने आपली चूक मान्य केली असून माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला. माध्यमांनी ते अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सादर केले. आम्ही एफआयआरला स्थगिती देण्याची विनंती करतोय.

एफआयआरला स्थगिती देण्यास नकार…
सरन्यायाधीश म्हणाले, तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? आपण उद्या या प्रकरणाची सुनावणी घेऊ. २४ तासांत काहीही होणार नाही, असे म्हणत न्यायालयाने शाह यांच्याविरुद्ध दाखल झालेलया एफआयआरमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि एफआयआरला स्थगिती देण्यासही स्पष्टपणे नकार दिला.

शाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५२, १९६(१)(ब) आणि १९७(१)(क) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला.

शाह काय म्हणाले होते?
शाह यांनी मंगळवारी महू येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, ज्यांनी आपल्या मुलींचे-बहिणींचे कुंकू पुसले होते, त्या कटे-पटे लोकांना आम्ही त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीच्या तेसी केली. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांचे कपडे काढू शकत नाही. पण, त्यांच्याच समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं. पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनं त्यांना धडा शिकवला. त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्र करून सोडले, असं शाह म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube