Swiggy Delivery Boy Job : चोच दिलीय तर चाराही मिळतोच! डिलिव्हरी द्यायला गेला अन् नशीबच बदललं…
Swiggy Delivery Boy Job : कोणाला कशी नोकरी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय फूडची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर ज्याला डिलिव्हरी दिली, त्याने भावूक होत त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करुन नोकरी मिळवून दिली आहे. एका सुशिक्षित बेरोजगाराची कोरोना महामारीत नोकरी गेल्यानंतर त्याने मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह केला, स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असताना एका आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मदतीने त्याला रोजगार मिळालाय. टेक फ्लॅश कंपनीचे मॅनेजर प्रियांशी चंदेल यांनी LinkedIn वर डिलिव्हरी बॉयची माहिती शेअर करताच त्याला नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
पालकांनो सावधान! इन्स्टाग्राम बनले लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डा; टास्क फोर्स करणार तपास
त्याचं झालं असं की, प्रियांशी चंदेल यांनी ऑनलाईन फूडची ऑर्डर केल्यानंतर स्विगीचा डिलीवरी बॉय साहिल सिंह ऑर्डर देण्यासाठी निघाला खरा पण त्याच्याकडे कुठलीही दुचाकी नसल्याने तो पायी ऑर्डरची डिलीवरी करीत असत. नेहमीप्रमाणे तो ऑर्डर घेऊन प्रियांशी चंदेल यांच्या ऑफिसकडे निघाला. त्याला ऑफिसपर्यंत पोहचण्यासाठी बराच कालावधी गेला.
जवळपास 3 किलोमीटर पायी चालल्यानंतर अखेर तो प्रियांशी चंदेल यांच्या ऑफिसजवळ पोहोचला. त्याने फूड पार्सल प्रियांशी यांना दिलं खर पण एवढा उशिर का झाला? असा सवाल चंदेल यांनी केल्यानंतर त्याने खरी हकीकत त्यांना सांगितली. साहिल म्हणाला, मी जम्मूचा आहे, कोरोना काळात माझी नोकरी गेलीय, आई-वडील म्हाताराे झालेत, शिवाय मी एक इंजिनिअर आहे. याआधी अनेक कंपन्यांमध्ये मी काम केलंय, माझं वय 30, त्यामुळे घरी पैसे मागू शकत नाही.
WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ-ट्रेव्हिस या फलंदाजांनी मोडला 111 वर्षाचा जुना ‘हा’ विक्रम
नोकरी गेल्यापासून स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी काम करीत असून माझ्याकडे दुचाकी नाहीये, मी 3 किलोमीटर पायी चालत तुमची ऑर्डर देण्यासाठी आलो आहे, माझ्याकडे पैसे नाहीत मागील आठ दिवसांपासून मी फक्त चहा आणि पाणी पित असल्याचं त्याने प्रियांशी चंदेल यांना सांगितलं.
अखेर प्रियांशी यांना त्याच्या कष्टाचं आश्चर्य वाटलं, त्यांनी लगेचच त्याच्या नोकरीसाठी हालचाली करत साहिलची माहिती LinkedIn वर शेअर करत नोकरीचं आवाहन केलं. आवाहनानंतर साहिलच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार दर्शवला. एकाने तर साहिलची राहण्याची व्यवस्था करत असल्याची कमेंट केलीय.
राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!
प्रियांशी यांनी केलेल्या पोस्टमध्ये साहिलचे मार्कशीट इतर तपशीलही शेअर केले आहेत. साहिलने त्याचं शालेय शिक्षण जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण केलं असून मेवाड विद्यापीठातून त्यांने बी.टेक.ची पदवी मिळवली आहे.
मला पैसे नकोय, नोकरी हवीय…
माझी खरी परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडलीय. मला तुमच्याकडून पैशांची अपेक्षा नाहीतर मला नोकरी मिळवून देण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती साहिलने प्रियांश चंदेल यांच्याकडे केली होती.
दरम्यान, प्रियांशी चंदेल यांच्या प्रयत्नानंतर साहिलला नोकरी मिळाली असून त्याला नेमकी कुठे नोकरी मिळालीय याबाबत प्रियांशी यांनी सांगितलं नसून प्रियांशी यांनी केलेल्या मदतीनंतर साहिलने त्यांचे आभार मानले आहेत.