टाटा समूहातील शेअर्समध्ये अचानक मुसंडी ! टाटा केमिकल्समध्ये 14 टक्क्यांनी वाढ, कारणं काय ?
N. Chandrasekaran: टाटा केमिकल्सचा शेअर्स तर एका दिवसात तब्बल 14 टक्क्यांनी वाढला आहे. संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) टाटा सन्सच्या चेअरमनपदी राहणार.
TCS, Tata Chemicals, other group stocks zoom up to 14% on Tata Sons IPO nod : N Chandra’s term extension : टाटा समूहामध्ये (Tata Group) आज दोन मोठे निर्णय झाले आहेत. या निर्णयामुळे या समुहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आहेत. टाटा केमिकल्सचा शेअर्स तर एका दिवसात तब्बल 14 टक्क्यांनी वाढला आहे. संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) हे टाटा सन्सच्या चेअरमनपदी राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. तर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संभाव्य शेअर बाजारातील आयपीओ (IPO) लिस्टिंगची प्रक्रिया पुढे नेण्याचा.
गेल्या महिन्यात संचालक नोएल टाटा व एन. चंद्रशेखरन यांचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु आता तेच आणखी पाच वर्षे चेअरमन राहणार आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी टाटा समूहातील शेअर्समध्ये अचानक खरेदी वाढली. त्यामुळे बाजारातील व्यवहारादरम्यान टाटा समूहातील काही शेअर्स 14 ते 6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या दोन्ही घडामोडी समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष टाटा समूहाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सकडे वळले. या तेजीमध्ये टाटा केमिकल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा टेलीसर्व्हिसेससह इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झालीय.
आजोबांचं मार्गदर्शन घ्या, दृष्टीकोन बदलला तर फरक पडेल; आमदार पाचपुतेंनी पवारांची दुखरी नस दाबली…
Tata Sons च्या लिस्टिंगची प्रक्रिया पुढे
संचालक मंडळाने केवळ चेअरमनच्या कार्यकाळाबाबत निर्णय घेतलेला नाही. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या Tata Sons च्या संभाव्य शेअर बाजारातील लिस्टिंगची प्रक्रियाही पुढे नेण्यात आली आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग कंपनी आहे. त्यामुळे तिच्या संभाव्य लिस्टिंगशी संबंधित घडामोडींचा परिणाम टाटा सन्सशी थेट संबंधित असलेल्या विविध टाटा कंपन्यांच्या शेअर्सवरही बाजारात दिसून येत आहे.
अमेरिकेतील व्याजदर वाढले ! सोने स्वस्त होणार पण रुपयामुळे भारताचे टेन्शन वाढणार ?
कोणत्या शेअर्समध्ये तेजी?
टाटा केमिकल्स: 13.5 टक्क्यांनी वाढून 831.00 वर पोहोचला.
टाटा टेलीसर्व्हिसेस: शेअर 7.3 टक्क्यांनी वाढून 38.14 वर पोहोचला.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन: शेअरमध्ये 7.3 टक्क्यांची वाढ होऊन तो 732.10 वर पोहोचला.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स: शेअर 6.2 टक्क्यांनी वाढून दिवसाच्या उच्चांकी 319.70 वर पोहोचला.
टाटा स्टील: शेअर 3.5 टक्क्यांनी वाढून 189.40 वर पोहोचला.
टाटा मोटर्स: शेअरमध्ये 3 टक्क्यांची वाढ होऊन तो ₹436.90 वर पोहोचला.
TCS: शेअरमध्ये 3.2 टक्क्यांची वाढ झाली.
टाटा पॉवर: शेअर 2.5 टक्क्यांनी वाढला.
इंडियन हॉटेल्स: शेअरमध्ये 2.2 टक्क्यांची वाढ झाली.
टाटा एलेक्सी: शेअर 1 टक्क्यांनी वाढला.
टाटा सन्सविरुद्ध आरबीआयची कडक भूमिका नकार
टाटा सन्सला शेअर बाजारातील लिस्टिंगमधून सूट हवी होती. या कंपनीला NBFC म्हणजेच नॉन-बँकिंग फायनान्शियलमधून बाहेर काढावे, अशी मागणी टाटा सन्सची होती. पण रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) ने टाटा सन्सची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर कंपनीवर आयपीओ आणण्याचा दबाव वाढला होता. तसेच टाटा सन्सकडून कायदेशीर मार्ग काढला जाऊ शकते, असे वाटल्याने आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात केव्हिएट दाखल केलेले आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आरबीआयचा नियम पाळून टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्टिंग करावे लागणार आहे. त्यामुळे टाटा ग्रुपने टाटा सन्सचा आयपीओ आणण्यासाठी पावले उचलले आहेत.
शापूरजी पालोनजी ग्रुपचा 18 टक्के हिस्सा
शापूरजी पालोनजी ग्रुपची टाटा सन्समध्ये 18.4% भागीदारी आहे. टाटा सन्सचे लिस्टिंग झाल्यामुळे त्यांच्या भागीदारीचे खरे मूल्य समोर येईल.त्यासाठी शापूरजी पालोनजी ग्रुप गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या लिस्टिंगची मागणी करतेय. गुंतवणूकदारांसाठी कंपनीतील मूल्य खुले करण्यासाठी लिस्टिंग आवश्यक असल्याचे शापूरजी पालोनजी ग्रुपचे म्हणणे आहे. भविष्यात जर शापूरजी पालोनजी ग्रुपला आपले शेअर्स विकून किंवा गहाण ठेवून पैसे उभे करायचे असतील, तर बाजारात लिस्टिंग कंपनी असल्यामुळे हे काम खूप सोपे होईल.