रिझर्व्ह बँकेने उचललं मोठं पाऊल?, सरकारने 1.20 लाख कोटींचं सोनं विकलं?, नक्की काय घडलं?

अशाप्रकारे, या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी परकीय चलन खरेदी करण्याकरिता रिझर्व्ह बँकेला तिजोरीतील टनभर सोने विकण्यास भाग पडले आहे.

News Photo   2026 06 03T151010.286

इराण आणि अमेरिकेतील संघर्षाचा भारताच्या (RBI) अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होताना आता जाणवू लागले आहेत. एकीकडे देशाचे चलन सतत गंटागळ्या खात आहे तर दुसरीकडे शेअर मार्केटमधून गुंतवणूकदारही आहेर पडू लागले आहेत या दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर इतका गंभीर परिणाम झाला आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्या तिजोरीतील अब्जावधी डॉलर्स किमतीचे सोने विकण्यास भाग पडले आहे असा खळबळजनक दावा समोर आला आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिस्टने म्हटले आहे की मध्य-पूर्वेतील युद्धामुळे भारतीय चलनावर मोठा दबाव येत असून चलनाच्या घसरणीमुळे देशाचा आयात खर्चही वाढत आहे.

अशाप्रकारे, या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी परकीय चलन खरेदी करण्याकरिता रिझर्व्ह बँकेला तिजोरीतील टनभर सोने विकण्यास भाग पडले आहे. कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार भारताचे पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जेचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत, बलाढ्य डॉलर आणखी मजबूत होत असून देशांतर्गत चलन कमकुवत होत असल्याने परकीय चलन साठ्याबाबतचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशाप्रकारे, या बाह्य घटकांचा धक्का मर्यादित करण्यासाठी सरकारने परकीय चलन प्रवाहाची गती मंदावणे आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्याच्या उद्देशाने आजवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये इंधनाच्या किमतींमध्ये केलेली वाढ आणि मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात केलेल्या मोठ्या वाढीचा समावेश आहे.

FWICE कडून रणवीर सिंगवरील बंदीचा आदेश मागे; रणवीरच्या कायदेशीर नोटीसनंतर घेतला निर्णय

अशाप्रकारे, या बाह्य घटकांचा धक्का मर्यादित करण्यासाठी सरकारने परकीय चलन प्रवाहाची गती मंदावणे आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्याच्या उद्देशाने आजवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये इंधनाच्या किमतींमध्ये केलेली वाढ आणि मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात केलेल्या मोठ्या वाढीचा समावेश आहे. सरकारने अलीकडेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील मौल्यवान धातूंचे मूल्य वाढल्याचेही अभिषेक गुप्ता यांनी पुढे म्हटले. डॉलरचे मूल्यही वाढता कल दर्शवत आहे, ज्यामुळे आरबीआयला आपल्या तिजोरीतील सोनं विकणं भाग पडलं.

रुपयाचे अवमूल्यन आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे वाढलेल्या तेल आयातीचा भार या आव्हानांना भारतीय अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे परिणामी, चालू खात्यातील तुटीचा दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक परकीय चलन गंगाजळी वाढवण्यावर भर देत आहे. म्हणूनच डॉलर खरेदी करण्यासाठी बँकेने आपल्या तिजोरीतील सोने विकण्याचा मार्ग अवलंबला आहे. मार्च 2026 पर्यंत रिझर्व्ह बँकेकडे अंदाजे 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, त्यापैकी 77 टक्के सोनं देशातच राखीव ठेवलं आहे.

त्याचबरोबर, सहा महिन्यांपूर्वीपर्यंत देशाच्या एकूण सुवर्ण साठ्यापैकी 66% साठा आरबीआयकडे होता, पण रिझर्व्ह बँकेने त्यात 10% आणखी वाढ केली. तसंच रिझर्व्ह बँकेनंतर भारताच्या मालकीचे उर्वरित 23% सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे जमा आहे. रिझर्व्ह बँकेने यापैकी $12 अब्ज किमतीचे अंदाजे 82.6 मेट्रिक टन वजनाचे सोने विकले असेल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 4500 डॉलर्स औंस आहे म्हणजे, $12 अब्जमध्ये अंदाजे 83 टन सोने मिळेल आणि तितकंच सोनं विकलं तर आरबीआयकडे 797.50 मेट्रिक टन सोन्याचा साठा शिल्लक राहील.

अहवालात असेही म्हटले आहे की, इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी, परकीय भांडवल भारतातून सतत बाहेर जात होते, ज्यामुळे देशाची चालू खात्यातील तूट वाढत होती. अहवालानुसार, या संकटातून रुपयाचे संरक्षण करण्यासाठी, आरबीआयने सोन्यापेक्षा सहज उपलब्ध असलेल्या तरल परकीय चलनांना (जसे की डॉलर) प्राधान्य दिले. अहवालात म्हटले आहे की, मार्च महिन्याच्या अखेरीस आरबीआयकडे एकूण 880.52 मेट्रिक टन सोने होते.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 77% सोने भारतात होते, तर उर्वरित सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे होते. आरबीआयच्या अहवालानुसार, 31 मार्च 2025 रोजी बँकेकडे 879.58 मेट्रिक टन सोने होते, जे 31 मार्च 2026 रोजी वाढून 880.52 मेट्रिक टन झाले. याचा अर्थ असा की, 2026 या आर्थिक वर्षात सोन्याचा साठा 0.94 मेट्रिक टनाने वाढला, कमी झाला नाही.

Tags

follow us