आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत महत्वाची बातमी; युद्ध थांबल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता
इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले होते. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली.
मोठ्या कालावधीनंतर अखेर (Fuel) इराण आणि अमेरिका युद्ध थांबले. दोन्ही देशात युद्धविराम शांतता करार झाला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले होते. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. इराण आणि अमेरिका युद्धानंतर आता होर्मुज खाडी सुरू आहे. अमेरिकेनेही तटबंदी काढली. या युद्धादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. आता कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसत आहेत.
इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती इतक्या जास्त वाढल्या होत्या की, भारतात तीन महिन्यात चार वेळा पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किमत 77 डॉलर प्रति बॅरल गेली. 16 टक्क्यांनी या किमती कमी झाल्या आहेत. शुक्रवारी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करारावर सह्या होणार आहेत.
महागाईचा मारा सुरूच! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोल-डिझेलही महागणार?
त्यापूर्वी त्यांनी युद्धविरामाची घोषणा केली. 14 अटींवर युद्धविराम करार झाले. विशेष म्हणजे इराणला जागतिक बाजारात आपले तेल निर्यात करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. अमेरिकेने इराणच्या तेलावर जागतिक बाजारात बंदी घातली होती. अखेर इराणच्या तेलावरील बंदीही या करारातून उठली आहे. इराणचे तेल बाजारात दाखल झाल्यावर सर्वात जास्त फायदा भारताचा आहे. कारण इराण आणि भारत यांच्यातील व्यवहार हा डॉलरमध्ये नाही तर रूपयांमध्ये होतो.
इराणचे तेल जागतिक बाजारात दाखल झाल्यानंतर अजून कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना भारतात देखील आता पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना सरकारने पेट्रोलच्या किमतीत वाढ केली होती. आता या किमती कमी होण्याचा अंदाज आहे.
होर्मुज खाडी बंद असताना सरकारकडून सातत्याने मोठे निर्णय घेतले जात होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा किमती कमी होत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात महागाई वाढली होती. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत होते. अखेर युद्ध थांबल्याने मोठा दिलासा मिळाला. काही देशात तर लॉकडाऊनची स्थिती होती.