stock market: शेअर बाजाराची आज नवी उसळी; सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा
Share Market : देशांतर्गत शेअर बाजार आज बुधवारी (3 जुलै) विक्रमी पातळीवर उघडले. (Market ) सेन्सेक्सने पहिल्यांदाच 80,000 चा टप्पा ओलांडलाय. तर निफ्टीनेही पहिल्यांदा 24,250 चा टप्पा ओलांडला आहे आज. (Share Market) सकाळपासून जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत होते.(Nifty) सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये 125 अंकांची वाढ दिसून आली.
आयटी शेअर्सवर दबाव NEET: नीट पेपफुट प्रकरणात दोन आरोपींना CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली आहे. कोटक महिंद्रा बँक देखील 1 टक्क्यांहून अधिक तेजीत आहे. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एसबीआय यांसारखे शेअर्स तेजीत आहेत. दुसरीकडे, सन फार्मा सर्वात जास्त 0.60 टक्क्यांनी घसरला. टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस सारखे आयटी शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात घसरले.
जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत
देशांतर्गत शेअर बाजाराला जागतिक बाजारातून पाठिंबा मिळत आहे. काल वॉल स्ट्रीटवरील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये होते. Dow Jones इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.41 टक्के, S&P 500 0.62 टक्के आणि Nasdaq 0.84 टक्क्यांनी वर होते. आज आशियाई बाजारही तेजीत आहेत. सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई 0.84 टक्क्यांनी वर होता, तर टॉपिक्स 0.08 टक्क्यांनी तेजीत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.26 टक्के आणि कोस्डॅक 0.5 टक्क्यांनी वधारले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
2 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,42,18,879.01 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 3 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,43,94,670.80 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,75,791.79 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 20 शेअर्स तेजीत आहेत. एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये सर्वाधिक तेजी आहे. दुसरीकडे, सन फार्मा, एनटीपीसी आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.
कोणताही बदल नाही पाणी, नाणी, वाणी नासू नये; तुकोबारायांचा अभंग अन् जयंत पाटलांची दादा, शिंदेंवर फटकेबाजी
आज BSE वर 2875 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 2205 शेअर्स तेजीत दिसत आहेत. 580 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 90 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 158 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 6 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 134 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 32 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.