Budget 2024 : 10 वर्षांत 25 कोटी लोकांची गरिबी संपली; सितारामन यांनी सांगितलं मोदी सरकारचं यश

Budget 2024 : 10 वर्षांत 25 कोटी लोकांची गरिबी संपली; सितारामन यांनी सांगितलं मोदी सरकारचं यश

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली (Union Budget 2024) आहे. केंद्र सरकारने सामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील हे दुसरे अंतरिम बजेट आहे. मागील वेळेप्रमाणे यंदाही बजेट डिजिटल पद्धतीने सादर करण्यात येत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. सबका साथ, सबका विकास याच धोरणावर सरकार काम करत आहे.

2014 मध्ये देशासमोर अनेक आव्हाने होती. या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत सरकारने अनेक निर्णय घेतले. लोकांच्या कल्याणाकडे लक्ष दिले. देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांसाठ किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली. आता 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनविण्याच्या दिशेने आम्ही काम करत असल्याचे सितारामन म्हणाल्या.

Union Budget 2024 : बजेट सादर करताच अर्थमंत्र्यांच्या नावे मोठे रेकॉर्ड; चिदंबरमही पडणार मागे

देशतील गरीब, महिला, युवक आणि शेतकरी यांना आधिक सक्षम बनवणे यांवर सरकारने जास्त भर दिला आहे. सरकारने मागील 10 वर्षांच्या काळात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. चार कोटी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा फायदा मिळाला आहे. डीबीटीच्या माध्यमातून देशातील 11.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 34 लाख कोटी रुपय जमा करण्यात आल्याचे सितारामन म्हणाल्या.

स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेमुळेही देशातील मोठ्या वर्गाचा फायदा झाला आहे. उच्च शिक्षणात आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने सरकारने सात आयआयटी, 17 ट्रिपल आणि तीन हजार नवीन आयआयटी सुरू केले. पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी लोकांना 22.5 लाख कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले.मागील दहा वर्षांच्या काळात उच्च शिक्षणात महिलांची भागीदारी 28 टक्क्यांनी वाढली आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 70 टक्के घरकुले महिलांना मिळाली आहेत.

Budget 2024 मध्ये महिलांसाठी मोठी घोषणा! 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube