वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ‘टिप टिप बरसा पानी…’ : PM मोदींचा जिव्हाळ्याचा प्रोजेक्ट विरोधकांच्या निशाण्यावर

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ‘टिप टिप बरसा पानी…’ : PM मोदींचा जिव्हाळ्याचा प्रोजेक्ट विरोधकांच्या निशाण्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचा असलेला प्रोजेक्ट म्हणून वंदे भारत एक्सप्रेसला ओळखले जाते. देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या 26 जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्सप्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावं लागतं आहे. (Rain water is leaking from the roof of the Vande Bharat train)

काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या बोगीमध्ये पाणी पडताना दिसत आहे. एक कामगार पडणाऱ्या पाण्याखाली प्लास्टिकचे बॉक्स ठेवताना दिसत आहे. तर आतमध्ये प्रवासीही बसलेले दिसतात. केरळ काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ वंदे भारत एक्सप्रेसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. 8 सेकंदाचा हा व्हिडीओ कोणत्या ट्रेनचा आणि कधीचा आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला! PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा

मात्र, काँग्रेस या व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, व्हिडिओबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. रात्री 10.30 वाजेपर्यंत 61 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. तर व्हिडिओला 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले होते.

यापूर्वीही वंदे भारत ट्रेन अनेकदा वादात सापडली आहे. कधी जनावरे धडकल्याने ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर कधी दगड लागल्याने किंवा पक्षाची धडक बसल्याने काचा फुटल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. याशिवाय ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबतही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Defamation Case: वर्तमानपत्रातील ‘त्या’ जाहिरातीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना मानहानीची नोटीस

आणखी 5 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात :

येत्या 26 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवासह 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यापूर्वी देशातील जवळपास 17 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यात आता मुंबई-गोवा, बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या 5 मार्गांवरुनही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. एकाच दिवशी पाच वंदे भारत गाड्या सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.याशिवाय पुरी-हावडा मार्गावरही लवकरच वंदे भारत ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube