अदानी समुहाकडून गुजरातला मोठं गिफ्ट; स्पेसमधून दिसणारं ग्रीन पार्क उभारणार

  • Written By: Published:
अदानी समुहाकडून गुजरातला मोठं गिफ्ट; स्पेसमधून दिसणारं ग्रीन पार्क उभारणार

Vibrant Gujarat Summit : अदानी समुहाकडून गुजरातच्या नागरिकांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात केली जाणार आहे. या अंतर्गत कच्छमध्ये एका ग्रीन एनर्जी पार्कची उभारणी केली जाणार असून, हे पार्क अंतराळातूनही दिसणार आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे. ते व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये बोलत होते.

ते म्हणाले की, गेल्या शिखर परिषदेत अदानी समूहाने राज्यात 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते, त्यापैकी 50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. कच्छमध्ये अदानी समुहाकडून 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला 30 GW क्षमतेचा ग्रीन एनर्जी पार्क बनवला जात आहे. याची खासियत म्हणजे हे पार्क अंतराळातूनही सहज दिसणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही ग्रीन सप्लाय चेनचा विस्तार करत असल्याचे अदानींनी सांगितले. यामध्ये सोलर पॅनेल, विंड टर्बाइन, हायड्रोजन इलेक्ट्रोलिसिस, ग्रीन अमोनिया आणि पीव्हीसी यांचा समावेश आहे. याशिवाय तांबे आणि सिमेंट उत्पादनाचाही विस्तार केला जात आहे. 2014 पासून भारताने जीडीपीमध्ये 185 टक्के आणि दरडोई उत्पन्नात 165 टक्के वाढ साधली आहे.

नगरसाठी शरद पवारांचं काय ठरतंय? ढाकणे, तनपुरे की आणखी कोण? लवकरच फैसला

टाटा सुझुकी समूहाचीदेखील गुंतवणूक

अदानी समुहाशिवाय गुजरातमध्ये टाटा आणि सुझुकी समुहानेदेखील मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.  गुजरात आणि टाटा यांच्यातील संबंध अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. टाटा 1939 पासून गुजरातमध्ये कार्यरत आहेत. गुजरातमध्ये टाटाच्या 21 कंपन्या असून, येथे 50000 हून अधिक टाटा कर्मचारी काम करत आहेत. टाटा बडोदा ते धौलेडापर्यंत C295 संरक्षण विमान विकसित करणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये येत्या दोन महिन्यांत 20-GW बॅटरी स्टोरेज कारखाना सुरू होणार असल्याचे टाटासन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.

Video : राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांचा डान्स? सरकार काय कारवाई करणार?

सुझुकी मोटर्सची 35000 कोटींची गुंतवणूक

मारुती सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन गुजरातमधून लाँच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुझुकी मोटर गुजरातमध्ये 3200 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या प्लांटसाठी 35000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे तोशिहिरो सुझुकी यांनी सांगितले. या घोषणेमुळे सुझुकीने गुजरातमध्ये 38200 कोटींची मोठी गुंतवणूक योजना सादर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube