राज्यसभेत सरकारची अग्निपरीक्षा! आज वक्फ विधेयक सादर होणार; चर्चेसाठी 8 तासांचा वेळ

राज्यसभेत सरकारची अग्निपरीक्षा! आज वक्फ विधेयक सादर होणार; चर्चेसाठी 8 तासांचा वेळ

Waqf Amendment Bill in Rajya Sabha : लोकसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर गुरुवारी मध्यरात्री वक्फ संशोधन विधेयक (Waqf Amendment Bill) बहुमताने मंजूर करण्यात आले. जवळपास दहा ते बारा तासांच्या चर्चेनंतर या विधेयकावर मतदान झाले. विधेयकाच्या बाजून 288 मते पडली. यानंतर आता आज दुपारी 1 वाजता विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे. राज्यसभेतून बिल पास करुन घेणे यात केंद्र सरकारची अग्निपरिक्षाच होणार आहे. कारण राज्यसभेतील नंबर गेम वेगळाच आहे. त्यामुळे राज्यसभेतून विधेयक मंजूर करुन घेणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली होती तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केले होते. या विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सत्ताधारी देखील पूर्ण तयारी करूनच आले होते. त्यांनी देखील विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी 100 पेक्षा जास्त संशोधन प्रस्ताव दिले. पण मतदानाच्या वेळी विरोधकांचे सर्वच प्रस्ताव पडले. विरोधकांचा प्रत्येक दावा फेल ठरला आणि लोकसभेत विधेयक बहुमताने मंजूर झाले.

भाजपचे स्वप्न पूर्ण : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

राज्यसभेत नंबर गेम काय ?

यानंतर आज दुपारी विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू राज्यसभेत विधेयक मांडतील. विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. यानंतर विधेयकावर मतदान घेतले जाणार आहे. राज्यसभेत एनडीए आघाडीचे 119 खासदार आहेत. 6 मनोनित सदस्य आहेत हे देखील सरकारबरोबरच आहेत. म्हणजेच एकूण 125 खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीतील 88 खासदार आहेत. तसेच वायएसआर काँग्रेसनेही विधेयकाचा विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधातील आकडा 95 पर्यंत पोहोचला आहे. यातच 16 खासदार असे आहेत ज्यांच्याबाबतीत अजून सस्पेन्स आहे.

राज्यसभेतील आकडेवारी पाहिली तर येथेही सरकारचे पारडे जड दिसत आहे. राज्यसभेत एकूण 236 खासदार सध्या आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी 119 मतांची गरज आहे. विरोधकांकडून राज्यसभेतही या विधेयकाचा विरोध करण्याची रणनीती आहे. राज्यसभेचे सत्र सुरू होण्याआधी विरोधी आघाडीची बैठक होऊन रणनीती ठरवली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधेयकाला रोखण्यासाठी विरोधकांकडून संयुक्त रणनीती आखण्यात येत आहे.

एका विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा म्हणून विरोधी मतदान, वक्फवरून बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यसभेतही विधेयक मंजूर करून घेऊ असा विश्वास केंद्र सरकारला आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, बृजलाल, मेघा कुलकर्णी, शमिक भट्टाचार्य, राधामोहम दास अग्रवाल, गुलाम अली यांच्यावर जबाबदारी दिली आहे. या खासदारांकडून वक्फ संशोधन विधेयकावर तर्क दिले जातील. सभागृहात या विधेयकावर चर्चेसाठी एकूण आठ तासांचा वेळ देण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube