… अन्यथा तुमचं प्रसारण रोखू; पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर बीबीसीला भारताचा इशारा

we will stop your broadcast India warns BBC after Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून वेगाने पावलं उचलली जात आहेत. पहलगाम दुर्घटनेनंतर शेजारील देशांमधील तणावपूर्ण संबंध आहे. त्यात वृत्तवाहिन्यांमुळे हे संबंध आणखी बिघडू शकतात. हे संबंध आणिखी ताणले जाऊ नयेत म्हणून त्यात आता केंद्र सरकारने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे.
सरकारने बीबीसीला दिला इशारा!
बीबीसीसह सर्व विदेशी वाहिन्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना भारतात प्रसारण करण्याचा त्यांचा परवाना हा त्यांना दिलेला एक विशेषाधिकार आहे. मात्र हा अधिकार मिळाला असला तरी देखील देशातील नियम आणि कायदे पाळणे त्यांना बंधनकारक आहे. मात्र तरी देखील तुम्ही तुमचे पुर्वग्रह देशात पसरवत असाल तर तुम्हाला भारतात प्रसारण करण्याचा तुमचा अधिकार नाकारण्यात येऊ शकतो. असं केंद्र सरकारकडून 6 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे.
कारण बीबीसीकडून पहलगाम दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये बीबीसीने भारतीयांचे व्हिसा पाकिस्ताने निलंबित केले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांना दहशतवादी नाही तर उग्रवादी म्हटलं आहे. मात्र हे उग्रवादी नसून दहशतवादीच होते. जे पाकिस्तानमधून आल्याचं देखील सांगितलं जात अआहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यात बीबीसीने मात्र वेगळी भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
All foreign channels including @BBCWorld must know that their license to broadcast in India is a privilege, and is subject to the rules and laws of India.
If you start pushing ur prejudices and biases, odds are that you will loose ur access to the Indian audience/market https://t.co/ThW4A2eOW5
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@RajeevRC_X) April 28, 2025
भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी…
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. (Pahalgam Terror Attack) प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3 कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर (Pakistan Youtube Channels) भारतात बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक
बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज या वृत्तसंस्थांचे यूट्यूब चॅनेल समाविष्ट आहेत. पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवर देखील बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इतर हँडलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.