विषय सोपा : कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक?

विषय सोपा : कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण या कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो? त्यांचे अधिकार काय असतात, ते किती वेगळे असतात? त्यांना वेतन किती मिळते, याचा घेतलेला हा आढावा… (What exactly is the difference between Cabinet and Minister of State? What are their rights?)

1. कॅबिनेट मंत्री

■ मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो. संबंधित मंत्रालयाची जबाबदारी त्याच्याकडे असते.

■ कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविलेली असते.

■ मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावेच लागते.

■ कॅबिनेट मंत्र्यांना दरमहा 2.32 लाख रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात.

राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री; शरद पवारांनी टाकला होता शब्द, अंकुशराव काकडेंचा मोठा खुलासा

2. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

■ कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात.

■ एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते, परंतु त्यांचा दर्जा कॅबिनेटचा नसतो.

■ हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतातच असे नाही.

■ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांना दरमहा 2.31 लाख रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात.

राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री; शरद पवारांनी टाकला होता शब्द, अंकुशराव काकडेंचा मोठा खुलासा

3. राज्यमंत्री

■ कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्रिपदाची निर्मिती केली आहे. ते कॅबिनेट मंत्र्याना रिपोर्ट करतात.

■ राज्यमंत्र्यांना किती आणि कोणते अधिकार द्यायचे, याचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांना असतात.

■ एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात.

■ कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात.

■ राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते.

■ राज्यमंत्र्यांना दरमहा 2.30 लाख रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज