Rahul Gandhi: राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार?, शरद पवारांनी दिलं निमंत्रण

Rahul Gandhi: राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार?, शरद पवारांनी दिलं निमंत्रण

Rahul Gandhi : ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती (Mahayuti) तसेच महाविकास आघाडीने (MVA) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

यातच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह प्रणिती शिंदे (Praniti Shinde) , धैर्यशील मोहिते (Darishsheel Mohite) यांनी राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे.

या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीला यावं, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट (2 जुलै) मंगळवारी झाली असून पंढरपूरच्या वारीला राहुल गांधी यांना येण्याचं निमंत्रण या भेटीदरम्यान देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी वारीला येण्याबाबत बाबत लवकर आपल्याला कळवतो असं म्हटल्याचं कळतंय. त्यामुळे राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच या भेटीदरम्यान, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जर राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला आले तर याचा फायदा महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो अशी चर्चा सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे राहुल गांधी हे निमंत्रण स्वीकारणार का? हे पाहावे लागणार आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी सध्या मोदी सरकारला देशातील विविध मुद्यांवरून हल्लाबोल करत आहे. नुकतंच राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या देशाचा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

लोणावळ्यात फिरण्याचा प्लॅन तर जाणून घ्या नवीन नियमावली, रात्री 12 पासून होणार लागू

राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना बोलताना राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएससह नीट परीक्षा आणि अग्निवीर योजनेवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज