त्यांना मास लीडर नको होता, दरबारी राजकारण पाहिजे होते; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

त्यांना मास लीडर नको होता, दरबारी राजकारण पाहिजे होते; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात प्रतिस्पर्धी उभा केले आणि त्यांच्यात भांडणे लावली होती. एकाला एक उभा करायचा आणि दुसऱ्याला दुसरा उभा करायचा, भांडण लावायचे, मजा बघायचे. आम्ही याचे साक्षीदार आहोत. असा कोणता पक्षप्रमुख करतो? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलं. पण शिवतीर्थावर भर सभेत कारस्थान करुन मनोहर जोशी यांचा अपमान केला होता. त्यांना अपमानीत करुन स्टेजवरुन खाली उतरवलं होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मी त्यांना सांगयचो कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्ते मोठे केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. पण त्यांना स्वत:च्या नेतृत्वावर नव्हता. त्यांना मास लीडर नको होता. त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होतं. चांगलं भाषण करायला लागला की त्यांचं भाषण कटं करायचे. जो ज्याचा गुण आहे त्याला संधी दिली पाहिजे. तरच कार्यकर्ता मोठा होत असतो. तुम्हाला स्वत:ला इतके असुरक्षित का समजत होतात? इतके लोक सोडून का जात आहेत याचे आत्मपरीक्षण करा. लोक सोडून जात आहेत मग सगळ्यांनी खोके घेतले का? पन्नास खोके, पन्नास खोके, अहो लाखो लोक तुम्हाला सोडून आमच्याकडे आलेत. इतके लोक खोके घेऊन आलेत का? आतापर्यंतचे सगळे खोके कुठं गेले? हे एक दिवस महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आल्याशिवाय राहाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray : भाजप दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून सोडून देतील

बाळासाहेब म्हणाले होते की मला एक दिवस देशाचे पंतप्रधान करा, कशासाठी तर राम मंदिर बांधण्यासाठी, 370 कलम हाटवण्यासाठी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदीराचे काम सुरु आहे आणि अमित शहांनी 370 कलम हटवले आहे. मी मागील आठवड्यात जम्मू काश्मीरला गेलो होतो. त्यावेळी मला अभिमान वाटला. ज्या लाल चौकात तिरंगा फडकावून देत नव्हते, तिरंगा जाळत होते, पाकिस्तानचा झेंडा लावत होते. तिथं तिरंगा फडकताना पाहिला आणि त्याच चौकात एकनाथ शिंदेंचे पोस्टर झळकत होते. राज्य प्रमुखांची बैठक देखील त्याच लाल चौकात घेतली होती. मग आम्ही युती कोणाशी केली? ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले त्यांच्याशी युती करुन आम्ही चुक केली का? मग गद्दार कोण? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube