मनसेनंतर आपने विधानसभेसाठी शड्डू ठोकला; थेट उमेदवार जाहीर
Vidhansabha Election : येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मेळावे घेतले जात आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानेही (Aam Aadmi Party) महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला. ‘आप’ने आज (ता. 25) तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. आपने परभणीतून सतीश चकोर (Satish Chakor) यांची उमेदवारी जाहीर केली.
PM Modi : महिलांवर अपराध करणारे सुटता कामा नये, पंतप्रधान मोदींचा इशारा
आम आदमी पक्षाने आतापर्यंत मराठवाड्यातील तीन जागांची घोषणा केली. याआधी बीड, लातूर विधानसभेसाठी आपने उमेदवार घोषित केले. आम आदमी पक्षाच्या राज्य संघटकांनी ही घोषणा करण्यात केली होती. तर आज आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली. त्यांना परभणीतून उमेदवारी दिली आहे.
यावेळी संग्राम पाटील म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असून त्या सरकारने दिल्लीत लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्यात. आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीकरांना मुलांचे शिक्षण असेल किंवा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत सोयीसुविधा दिल्या आहेत. त्यामुळेच आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातही आप सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युनिफाइडचा यू म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न; नव्या पेन्शन योजनेवरून कॉंग्रेसची बोचरी टीका
दरम्यान, एकीकडे आम आदमी पार्टी हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तर दुसरीकडे ते एक एक उमेदवार जाहीर करत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतच फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबईत 36 जागांवर लढणार
काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आम आदमी पक्ष मुंबईतील 36 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. आम्ही स्वबळावर विधानसभा लढविणार असल्याची घोषणाही शर्मा यांनी केली होती.
दरम्यान, विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत राज ठाकरेंची मनसे आघाडीवर आहे. मनसेने आतापर्यंत 7 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसेनेस्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय अन्य दोन महत्त्वाचे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.