शरद पवारांचा राजीनामा; पुण्यातील कार्यकर्त्यांने स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोडचे साहेब प्रतिष्ठाणचे संदिप शशिकांत काळे यांनी शरद पवार यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. संदिप काळे यांनी लिहिले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मुंबई येथे लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. अचानकपणे हा निर्णय जाहीर करण्यामुळे राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यात सर्वजण भावनिक झालेले दिसून आले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी भावनिक साद घातली.
पवारांची निवृत्तीची निर्णय घेताच विकिपीडियावर NCP चे राष्ट्रीय अध्यक्षपद Vacant
एकीकडे नेतेमंडळी, कार्यकर्ते साद घालत असतानाच पुण्यातील संदिप काळे यांनी स्वत:च्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. ते पत्रात लिहिताता ”माझे दैवत, माझे मार्गदर्शक आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण घेतलेल्या निर्णयाची बातमी वाचून मी व्यथित होऊन अतिशय दुःखी झालो आहे. साहेब मी आपल्या कार्याची माहिती पाहून मी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता झालो. आपल्या सारख्या आभाळा एवढ्या नेत्यांची उंची व कार्य पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. पक्षात काम करतो व सर्वसामान्यांचे प्रश्न आपले कार्य डोळ्यापुढे ठेवून आम्ही सोडवतो.
आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे दैवत आहात व कायम राहणार. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना आपण मोठं केलं घडवलं. आम्ही कुणाकडे पहावं? आम्हाला कोण घडवणार? साहेब आम्हाला पोरं करू नका.
पवारांच्या घोषनेनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात एकांतात नेमकी चर्चा काय?
मी आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि राहणार. साहेब मला तुमच्या नेतृत्वात काम करायचं आहे आणि पक्ष कायम मोठा ठेवायचा आहे. साहेब तुम्ही सांगाल ते धोरण आणि प्रत्येक घरी बांधू पक्षाचे तोरण. आदरणीय साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आपण आपल्या निर्णय मागे घ्यावा. आम्हाला पोरं करू नका.”