‘…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचे मोठं विधान

‘…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचे मोठं विधान

Sanjay Kakade : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सीएमपद जाणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं बोलल्या जातं. दरम्यान, अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी अनेक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मोठं विधान केलं. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar will definitely become Chief Minister BJP leader Sanjay Kakades statement)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

भाजपने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळं अजित पवार भाजपसोबत गेले, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, संजय काकडे म्हणाले, अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा कोणापासून लपलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार यांची पक्षाच्या वरिष्ठांशी वाटाघाटी किंवा चर्चा झाली असेल तर ते मुख्यमंत्री होतील. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार आहे? हे बघावे लागेल. अजित पवार गट महायुतीत सामील झाला असला तरी आगामी निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात आणि कोण निवडून येतो यावर सगळा आकडेमोड अवलंबून आहे.

नितीन देशमुखांनी ठाकरेंनाही मागे टाकलं, बावनकुळे-फडणवीसांवर केली जहरी टीका… 

ते म्हणाले, आम्ही बिहारमध्ये नितीश कुमारांचे कमी आमदार निवडून येऊनही त्यांना मुख्यमंत्री केलं होते. कारण त्यांनी आम्हाला लोकसभेत चांगलीच मदत केली. एकनाथ शिंदे यांच्याकडेही आमदार कमी असतानाही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. यापूर्वी मायावतींचे आमदार कमी असतानाही भाजपने मायावतींना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अजित पवार आणि आमचे नेतृत्व यांच्यात काही समझोता झाला असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील. खरे तर ज्याचे आमदार सर्वाधिक निवडून येतील, तोच मुख्यमंत्री व्हायला हवा. मात्र अनेक वेळा पक्षाच्या प्रमुख नेत्यांना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. पक्षश्रेष्ठींनी अजित पवारांना तसा शब्द दिला असेल तर नक्की मुख्यमंत्री होतील. अजित पवार यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले नेटवर्क आहे. याचा भाजपला नक्कीच फायदा होईल. अजित पवार मुख्यमंत्री होण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही, असे खासदार काकडे म्हणाले.

दरम्यान, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असू शकत नाही. त्यामुळं आगामी काळात एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार का?आणि गेलंचं तर कोणं मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube