लोणीकडे निघालेलं लाल वादळ थांबलं; सरकारच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. महसूलमंत्री विखे यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
बैठकीतील निर्णयांची माहिती देताना विखे म्हणाले, आम्ही मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. त्यांच्याशी चर्चा केली. काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले गेले. आणि या निर्णयाची अंमलबजावणी निश्चित वेळापत्रक तयार करून करू असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. बैठकीतील प्रतिनिधींनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
Weather Update : पुढील 3-4 तास काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
शेतकरी, शेतमजूर, कामगार व श्रमिकांचे विविध प्रश्न घेऊन दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबईपर्यंत लाँगमार्चचे आयोजन केले होते.
हा मार्च मुंबईच पोहोचण्याआधीच सरकारने केलेल्या मध्यस्थीमुळे स्थगित केला होता. त्यानंतरही आंदोलकांच्या मागण्या कायम असल्याने किसान सभेचे निमंत्रक कॉ. अजित नवले यांनी आज (26 एप्रिल) अकोले ते लोणी पायी मोर्चा व त्यानंतर लोणीत महामुक्काम आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील अनेक आदिवासी व शेतकरी अकोल्यात दाखल झाले होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अजित पवारांचं शिंदे सरकारला पत्र
या मोर्चाची दखल घेत कडाक्याचा उन्हाळा पाहता मोर्चा स्थगित करण्याची विनंती प्रशासन आणि मंत्री विखे यांनी केली होती. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यास नकार दिला होता. आज मात्र मोर्चेकरी आणि राज्य सरकार यांच्यात यशस्वी चर्चा झाल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.