Vidhansabha Election : मविआची 125 जागांवर सहमती, आम्ही 180 जागा जिंकणार, थोरातांचा दावा

  • Written By: Published:
Vidhansabha Election : मविआची 125 जागांवर सहमती, आम्ही 180 जागा जिंकणार, थोरातांचा दावा

Balasaheb Thorat : आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोदार कंबर कसली. विधानसभा निडणुकीच्या च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात आहेत. अशातच आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

Ganpati Bappa Song : ‘पार्वती नंदना, एकदंत गजानना’, वंदना गुप्तेंचं बाप्पासाठी स्पेशल गाणं 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली. तर उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जागा वाटपाविषयी विचारलं असता थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत दोन-तीन बैठका झाल्या असून 125 जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांसाठी गणेशोत्सवानंतर बैठक होणार असून त्या जागांवरही सहमती होईल. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढणार असून महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. 180 हून अधिक जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास विरोध करणार; अजितदादांचा रोख कुणाकडे? 

महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको, असंही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी याबाबत कायम भूमिका मांडली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देशाच्या विरोधात काम करणाऱ्या मुस्लिमांच्या आम्ही विरोधात आहोत, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे नक्कीच कौतुक केलं पाहिजे, त्यांनी योग्यच भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, असं म्हणत थोरातांनी ठाकरेंचं समर्थन केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube