‘बंजारा’ अन् ‘वंजारी’ एकच! चुकीचं वक्तव्य करुन लढा कमकुवत करु नका; चव्हाणांनी धनंजय मुंडेंना सुनावलं!

'बंजारा' अन् 'वंजारी' एकच, असं चुकीचं वक्तव्य करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नका, या शब्दांत पंजाबराव चव्हाणांनी आमदार धनंजय मुंडेंना सुनावलंय.

Untitle (93)

Punjabrao Chavan On Dhananjay Munde : बंजारा समाजाबाबत चुकीचं विधान करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नका, या शब्दांत याडी कांदबरीचे लेखक आणि बंजारा समाजातील ज्येष्ठ साहित्यिक पंजाबराव चव्हाण (Punjabrao Chavan) यांनी आमदार धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) सुनावलंय. आमदार मुंडे यांनी बीडच्या मोर्चात बंजारा समाजाबाबत विधान केलं होतं. त्यावरुन चव्हाण यांनी सुनावलंय.

अजितदादांची बीडकरांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची भेट; रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटींचा निधी

पुढे बोलताना पंजाबराव चव्हाण म्हणाले, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. वजारींचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य, बंजारा समाजापासून वेगळे आहे. बंजारा आणि वंचारी यांच्यात रोटी,बेटी व्यवहार होत नाही. दोन्ही जातींच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. वंजारी आणि बंजारा समाजाचा पेहराव वेगळा असून धनंजय मुंडे यांनी चुकीचं वक्तव्य करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नये, असं चव्हाण म्हणाले आहेत.

UPI Payment : आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू

तसेच बंजारा समाज हा पाड्यावर राहणार रआहे. वंजारी गावांमध्ये स्थिरस्थावर झालेले आहेत. वंजारी समाजाचे देव वेगळे आहेत. त्यांच्या चालीरीती, रुढी परंपरा, बंजारा समाजापासून वेगळ्या आहेत. सण उत्सव साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. केंद्र सरकारच्या आदिवासीसाठीचे पाचही निकष बंजारा समाज पूर्ण करत असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी बीड जिल्ह्यात विराट मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले. या मोर्चाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली व समाजाला पाठिंबा जाहीर केला. बंजारा आणि वंजारी समाज एकच असल्याचं विधान मुंडे यांनी केलं होतं.

पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?

दरम्यान, ज्या समाजासाठी धनंजय मुंडे यांनी हे विधान केलं होतं, त्याच समाजाकडून आता बंजारा आणि वंजारी एक नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता बंजारा समाजामधूनच मुंडे यांना विरोध असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एसटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. आम्हीसुद्धा तिकडे एसटी प्रवर्गातच आहोत. बंजारा आणि वंजारा वेगवेगळे आहेत का, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सोमवारच्या बंजारा समाजाच्या मोर्चावेळी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे.

follow us