Bhaskar Jadhav : तेव्हा मोदींना कोण ओळखत होतं… बाळासाहेबांचा फोटो वापरूनच निवडून आलात ना?
पिंपरी : स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या धनुष्यबाणाची पूजा केली ते धनुष्यबाण तुम्ही चोरून नेण्याचं पाप केलं. २०१४ आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना कोण ओळखत होते. तेव्हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच मतं मागितली ना, पंतप्रधान मोदी यांचा फोटो नसताना शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. मग आता माझा गद्दारांना प्रश्न आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कशाला वापरता आहात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली.
चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव बोलत होत.
https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg
कोरोनाकाळात भाजपने सरकार पाडण्याचे षडयंत्र केलं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या काळात चांगलं काम केले. ठाकरे आजारी असताना भाजपने ४० गद्दार गळाला लावले आणि सत्तातर केले. त्यांना वाटलं ठाकरे आजारातून बरे होणार नाहीत. मात्र ते आले आणि कामाला लागले आहेत. जर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणता. मग ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ का घेतली होती. याचे उत्तर का देत नाही, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.