बाळासाहेब थोरातांच राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य

  • Written By: Published:
Balasheb Thorat

रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावेळी ते म्हणाले, आपण राजीनामा दिला असं कोणी सांगितलं?, बाळासाहेब यांनी घेतलेल्या या यु-टर्नमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची बातमी चांगलीच चर्चेत होती. मात्र आता यावर स्वतः बाळासाहेब थोरात बोलले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट पक्षात पडले. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांनी विधीमंडळ नेतेपदाचा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता मी राजीनामा दिलाच नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Kasba By Election: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, हा रडीचा डाव 

बाळासाहेब थोरात म्हणाले…

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर पैसे वाटवाच्या केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली. “निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार होतं. म्हणजे चोराच्याच उलट्या बोंबा पैसे वाटायचे आणि तक्रारपण करायची. जो आरोप आहे तो गंभीर आहे. मात्र प्रशासनाने काळजी घेऊ, असं आश्वासन दिलंय. कसब्याच्या निवडणूकीत आम्ही प्रचाराला गेलो. जर काँग्रेसमध्ये ताळमेळ नाही, असं म्हणता. मग घाबरता का? एवढी यंत्रणा कसब्यात प्रचारासाठी भाजपनं उतरवली”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

Tags

follow us