भाजप देणार शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू; बावनकुळेंनी थेट सांगितले

भाजप देणार शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू; बावनकुळेंनी थेट सांगितले

Chandrashekhar Bawankule :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांविषयी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याविषयी भाष्य केले असून शिंदेंच्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडने दिले असल्याचे राऊत म्हणाले.

CM शिंदेंच्याच बालेकिल्ल्यावर भाजपचा दावा; ठाणे जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळाला कानमंत्र

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचा मी 32 वर्षांपासून कार्यकर्ता आहे. कुणाच्या अधिकारात हस्तक्षेप केला जात नाही. कुणाला मंत्री ठेवायचं किंवा कुणाला नाही हा संपूर्णपणे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आमचं युतीचं सरकार आहे. भाजपात कोण मंत्री व्हावं हे भाजपा ठरवतं. एकनाथ शिंदें त्यांच्या मंत्र्यांविषयी ठरवतील. आमच्यात काहीतरी भांडण लागावं म्हणून अशा पुड्या सोडल्या जात आहेत असं बावनकुळे म्हणाले.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

एकप्रकारे बावनकुळे यांनी या वादावर पडदा टाकण्याचे काम केले आहे. पण शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन बिनसलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा तर केलाच आहे. याशिवाय या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे 2 दौरेही झाले आहेत. तसंच आता एका पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी करत, जोपर्यंत ही बदली होणार नाही तोपर्यंत कल्याणमध्ये शिवसेनेचे आणि शिंदेंचे कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या वादातून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube