राष्ट्रवादीच्या बॅनरवर चंद्रकांतदादांचा फोटो : हर्षवर्धन पाटील भडकले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T105425.924

दोन दिवसांपूर्वी भारतीय जनत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवीन 52 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर इंदापूर येथे एक सभा पार पडली. या सभेत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे चांगलेच भडकलेले पहायला मिळाले.

या जिल्ह्यातील प्रशासनामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे राजकारणात व समाजकारणात आपल्याल लोकांसाठी सत्ता राबवावी लागेल, असे त्यांनी बावनकुळे यांना सांगितले. तसेच आमच्या तालुक्यात अजब कारभार आहे. आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या इंदापूर शहरसाठी 13 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण राष्ट्रवादीवाल्यांनी चंद्रकांतदादांचे  फोटो आपल्या बॅनरवर लावले आहेत.

तुमचे मेहनतीचे हजार रुपये वाचवण्यासाठी उरले केवळ तीन दिवस

हे अजिबात सहन केले जाणार नाही. ही हसण्याची गोष्ट नसून आता आपल्याला यांच्या विरोधामध्ये पोलिस तक्रार नोंदवावी लागेल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हे जर थांबले नाही तर आपल्याला संघर्ष हातात घ्यावा लागणार आहे. यावेळी ते बोलताना चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. हा इंदापूर तालुक कुणाच्याही दावणीला बांधलेला नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे हे आता वर्षभर पक्षासाठी प्रवास करणार असल्याचे सांगितले. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्या दिवसापासून लोकसभा निवडणुका होईपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षासाठी प्रवास करणार आहेत व लोकसभा निवडणूक झाल्यावरच घरी जाणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?

दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आले आहेत. याआधी ते काँग्रेसमध्ये होते. 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube