मविआत एकत्र येण्यासारखं काही नव्हतं, कॉंग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र होते; मुनगंटीवारांची टीका
Sudhir Mungantiwar : काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे गट (UBT) विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भाष्य केलं.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकत्र येण्यासारखं काही नव्हते, काँग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. चंद्रपुरातील कर्मवीर मारोतराव कन्नमवार जयंती सोहळ्यास ते उपस्थित राहू शकले नाही, याबाबत माध्यमांनी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, याबाबत आज सकाळीच माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला0 जात असतांनाच मी त्यांना याबाबत कल्पना दिली हाती. काल मला निमंत्रण आले, तसे दर्गेवार यांचा कॉलही आला. मात्र, काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईत असल्याने आज या कार्यक्रमाला जाणं शक्य झालं नसल्याचं ते म्हणाले.
Jalna : ‘आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावला…’, संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली
यावेळी त्यांनी कॉंग्रेस-शिवसेना वादावरही भाष्य केलं. मुनगंटीवार म्हणाले की, पराभवाचे विश्लेषण करून पराभवाचे क्षण विजयात बदलता येत नाहीत. पराभव नम्रतेने स्वीकारावा लागतोय. कोणताही पक्ष किंवा नेता राजकीय अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारामध्ये कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीही एकत्र येत नाही आणि आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही तशी या पक्षांची युती होती, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
ते म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात एकत्र येण्यासारखं काही नाही. एक हिंदुत्वासाठी काम करणारा तर दुसरा हिंदुत्वावर टीका करणारा पक्ष आहे. २०१९ मध्ये त्यांनी जवळच्या फायद्यासाठी दूरचे नुकसान करून घेतले. ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते, अशी टीका त्यांनी केली.
भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याबाबत भाजपच्या बैठकांमध्ये असे विषय कधी आले नाहीत. एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री भाजप अमित शाह, मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस हे यावर निर्णय घेतली. जुन्या गोष्टी विसरून पुढं जायचं ठरल्यास तो पक्षाचा निर्णय असेल. मात्र, आज एकत्र येण्यासाची आवश्यकता दिसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षप्रवेशाचा निर्णय सीएम, प्रदेशाध्यक्ष घेतील
मुनगंटीवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी बंडखोरी केली किंवा पक्षविरोधी काम केलं. त्यांना पक्षात पुन्हा सामील करताना त्यांचा दीर्घकालीन फटका बसले याचा विचार केला पाहिजे. यासंदर्भातील निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असंही ते म्हणाले.