Sudhir Mungantiwar: राष्ट्रपती राजवटीवरुन मुनगंटीवारांचा जयंत पाटलांवर पलटवार

Sudhir Mungantiwar:  राष्ट्रपती राजवटीवरुन मुनगंटीवारांचा जयंत पाटलांवर पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान केले होते. या विधानाला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखली समर्थन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते.  यावरुन भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे.

मला असे वाटते सर्वोच्च न्यायालयामध्ये कितीही वकील लावले तरी हे आमदार अपात्र होऊ शकतच नाही, असा विश्वास मला कायद्याचा अभ्यासक असल्याने आहे, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी पक्षांतर करु नये म्हणून विरोधक असे बोलत असल्याचा टोला मुनगंटीवारांनी लगावला आहे.  याआधी जयंत पाटील यांनी शिंदे सरकार जाऊन राज्यात राष्ट्रपती शासन लागेल असा अंदाज वर्तवला होता.

Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात, असे जयंत पाटील म्हणाले होते.

Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…

दरम्यान, सर्व काही कायद्याने होणार असेल तर या सरकारमधील 16 आमदार हे अपात्र ठरतील. अगदी मुख्यमंत्र्यांसह, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षातील सुनावणीवरुन अनेक आपापले अंदाज वर्तवत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube