आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सर्वकाही आलबेल; गिरीश महाजनांनी गैरसमज दूर केला

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सर्वकाही आलबेल; गिरीश महाजनांनी गैरसमज दूर केला

Girish Mahajan : आमच्यात कोणतेही मतभेद नसून महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरीही अद्याप महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय संभ्रम निर्माण झालायं. अशात काळजीवाहू मुख्यमंत्री यांची अचानक तब्येत खराब झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. या घडामोडींबाबत सुरु असलेला गैरसमज गिरीश महाजनांनी दूर केलायं.

भाजपा युतीकडून तरुणांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचे काम, कंत्राटी भरतीवरून पटोलेंचा हल्लाबोल…

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे यांची तब्बेत खराब होती, त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे , टेम्प्रेचरदेखील आहे. मी आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तीन-चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. युतीमध्ये सगळं आलबेल आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ असून उद्यापर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल त्यानंतर ते बैठक देखील घेतील, असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय.

मंत्रिमंडळाबाबत माझी अशी कोणतेही चर्चा झाली नाही, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. माझी एक शब्द देखील याबाबत चर्चा झाली नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तेच बोलले 5 डिसेंबरच्या तयारीबाबत बैठक आहे. शिंदे यांना अजूनही त्यांना सलाईन लावलेलं आहे. उद्यापासून ते स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील, महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय.

भाजपा युतीकडून तरुणांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचे काम, कंत्राटी भरतीवरून पटोलेंचा हल्लाबोल…

उद्या आम्ही सर्व एकत्रित शपथविधीची जागा पाहणार…
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठीची जागा पाहण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेले होते. यासंदर्भात कुणाशी कोर्डिनेट झाला नाही हे खरं आहे. मात्र, महायुतीतील सर्वच घटक पक्षाचे नेते आणि आम्ही उद्या एकत्रितपणे पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय.

यावेळी बोलताना गिरीश महाजनांनी खातेवाटपावरही भाष्य केलंय. ते म्हणाले, मला याबाबत माहीत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. याबाबतीत आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं महाजनांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube