ड्रग्जच्या बाबतीत युवराजांना विचारा, हॉटेल हयातमधील पुरावे आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा इशारा

  • Written By: Published:
ड्रग्जच्या बाबतीत युवराजांना विचारा, हॉटेल हयातमधील पुरावे आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा इशारा

Prasad Lad : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक करण्यात आली असून सध्या त्याचा चौकशी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त झालं. यावर फडणवीसांनी बोलावं, ललित पाटील हा केवळ एक मोहरा आहे. या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर फडणवीस हे राजकारणासाठी करताहेत, अशी टीका राऊतांनी केली. यावर आता भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी भाष्य केलं.

Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा 

आज माध्यमांशी बोलतांना लाड म्हणाले की, ललित पाटीलच्या अटकेवर गृहमंत्र्यांनी कालच भाष्य केलं. ललित पाटील हा आरोपी आहे. त्याला अटक केली. त्याच्यासोबत सात आरोपींना अटक केली. कुठल्याही परिस्थितीत या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, असं फडणवीस स्पष्टपणे बोलले. वा. पी. ली. पी. संजय राऊतांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये. ते ड्रग्स प्रकरणात गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. पण, फडणवीस यांचं चरित्र संपूर्ण राज्य जाणून आहे. ड्रग्जच्या बाबतीत त्यांनी युवराजांना देखील विचारावं. 2029 मध्ये युवराज काय करत होते? बांद्रा बँडस्टॅन्ड, हॉटेल हयातमध्ये काय चालू होतं, हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, असा इशारा लाड यांनी दिला.

ललित पाटील प्रकरणाचे कनेक्शन दोन कॅबिनेट मंत्र्यासोबत आहे. फडणवीसांनी हिंमत असेल तर त्यांचे राजीनामे घ्यावेत. सूडाचा राजकारण करून नका. कारण, 2024 ला तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, असं राऊतांनी ठणकावलं. यावर लाड म्हणाले, राऊतांनी धमकी देऊ नये. हिंमत असेल तर 2024 ची वाट कशाला पाहता, आताच सुरूवात करा. आम्ही कधीही सुडाच राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुडाच राजकारण केल्या गेलं. सर्व नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांनी चौकशी लावल्या. कोर्टाने चपराक दिल्या नंतर पण त्यांनी त्रास दिला, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा केला. यावरही लाड यांनी भाष्य केलं. त्यांच्या संपर्कात कोण-कोण आहे, हे मी सांगू शकणार नाही. पण संपर्कात असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube