Sujay Vikhe : काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसतात…सुजय विखेंचा खासदार लंकेंवर निशाणा
काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसून येत आहेत, कुठल्याही वादात फोटो दिसणारच, या शब्दांत सुजय विखेंनी खासदार निलेश लंकेंवर टीका केलीयं.
Sujay Vikhe Patil : राज्यात काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसून येत असून कुठलाही वाद काढा त्यात फोटो दिसणारच, या शब्दांत भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil ) यांनी खासदार निलेश लंके यांच्या अप्रत्यक्ष टीका केलीयं. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त सुजय विखे आज अहिल्यानगरला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं. यावेळी त्यांनी राज्यातील इतर विषयांवर सडेतोडपणे भाष्य केलंय.
पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, आम्ही मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात राजकारण करीत असून मतदारसंघात हल्ली जे काही घडलं, त्या प्रक्रियेत आमचा लांब-लांबपर्यंत संबंध आढळून येत नाही. अशोक खरात प्रकरणात ज्या गोष्टी घडल्या, त्यात अनेकांचा बळी गेला. आता पोलिस तपासात अकाऊंट स्टेटमेंटमध्ये अनेक पक्षातील लोकांची नावे समोर येऊ शकतात, असं भाकित सुजय विखे यांनी केलंय.
तसेच काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसतात, अशी व्यक्ती समाजहिताच्या नसतात. राज्यातील कुठलाही वाद काढा तो व्यक्ती फोटोत दिसणारच मग खरात असो, सिस्पे असो, घोटाळा असो, किंवा खंडणी असो, कुठलीही केस नाही तिथं एक प्रतिनिधी वारंवार दिसत नाही, या शब्दांत सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर सडकून टीका केलीयं.
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात
प्राजक्त तनपुरेंचे आभार मानतो…
यावेळी बोलताना विखे यांनी राहुरी पोटनिवडणुकीवरही भाष्य केलंय. ते म्हणाले, राहुरी पोटनिवडणूक ही बिनविरोध न होता त्या ठिकाणी सात उमेदवारांनी आपले अर्ज ठेवल्याने या ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे. महाविकास आघाडीने उमेदवार दिला प्रत्येक उमेदवार हा सक्षम असतो आपण कोणालाही कमी लेखत नाही. निवडणूक ही निवडणूक असते, ती पार पाडावीच लागते. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानतो त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून निवडणुकीतून माघार घेतली, असल्याचंही सुजय विखे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी बारामतीसाठी सर्वकाही प्रयत्न करू शकते, तर राहुरीसाठी का काही केले नाही? दोन्ही परिस्थिती सारख्याच होत्या. अजितदादा यांच्यासह दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हे देखील अनेक टर्म न आमदार राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. जरी महाविकास आघाडीने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या व निवडणूक असल्या तरी मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलंय.