मोठी बातमी! बच्चू कडूंवर ठार मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
या प्रकरणात आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा (Accident) बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर मतदार संघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या एका साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिजीत दिवाकरराव तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली.
स्वत: ला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा; शेतकऱ्यांच्या परिषदमध्ये बच्चू कडूंची जीभ घसरली
माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप केला तायडे यांनी केली आहे. या कटात शुभम उर्फ गोलू माहोरे यांचा देखील समावेश असल्याची तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, मोबाईल संभाषणाचं रेकॉर्डिंग देखील तक्रारदाराकडून पोलिसात पुरावा म्हणून सादर करण्यात आलं आहे. दरम्यान, रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडं जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणात आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. चांदूर बाजार पोलिसांनी BNS कलम 55, 58, 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढचा तपास हा चांदूर बाजार पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणात थेट बच्चू कडू यांचे नाव आल्यानं खळबळ उडाली आहे.