तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची युतीसाठी स्वाभिमानी संघटनेला ऑफर; राजू शेट्टी म्हणाले…

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची युतीसाठी स्वाभिमानी संघटनेला ऑफर; राजू शेट्टी म्हणाले…

औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात आपल पक्ष वाढवण्याकरिता प्रयत्न सुरु केले. याकरिता ते राज्यात मराठी नेता हात देणार याचा शोध घेत आहे. दरम्यान यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली. मात्र राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसेच करिअर करण्याकरिता मी राजकारणात आलो नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्याकरिता लढण्यासाठी आलो आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. यामुळे चंद्रशेखर राव यांना आता नवीन नेत्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

दरम्यान याविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, तेलंगणा राज्याचा विकास कसा झाला, याविषयी माझी आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची बैठक झाली होती. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, आम्ही आता तेलंगणा राष्ट्र समिती राहिले नाही, भारत राष्ट्र समिती झालो आहोत. आमच्या पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात समावेश करण्यात आला आहे. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद घेऊन, आमच्या पक्षात यावे अशी विनंती चंद्रशेखर राव यांनी केली असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.

मात्र मी त्यांना नम्रपणे सांगितले की, तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील चांगली आहे. पण मी शेतकरी चळवळीकरिता स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्याने त्यांची ऑफर नाकारली असल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती.

शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचीही केसीआर यांच्याबरोबर भेट झाली. परंतु प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) येत्या १७ फेब्रुवारीला तेलगंणात केसीआर बरोबर एका सोहळ्यात राहणार आहेत. यामुळे केसीआर यांचा पक्षाचा महाराष्ट्रातला कोणाचा चेहरा कोण असणार ? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याशिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली होती. तसेच प्रकाश आंबेडकर देखील 17 तारखेला तेलगंणात केसीआर सोबत एका सोहळ्यात असतील.

आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मागणीवर केसीआर यांची देशाला नवी ओळख मिळाली आहे. तेलंगणा स्वतंत्र झाले. गेल्या २ वर्षांत रावांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटलेत. तिसऱ्या आघाडीचा प्रमुख बनून थेट पंतप्रधान किंवा किंगमेकर बनण्याचा प्रयत्नात केसीआर यांचा असणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमाकांच्या महाराष्ट्रावर केसीआरची नजर राहणार आहे. त्याकरिता स्थानिक नेत्यांना ते ऑफर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री करताना चंद्रशेखर राव यांचा शेतकऱ्यांच्या मुद्यावर अधिक भर असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube