“तासाभरात दोन-दोन जीआर निघतात, शब्दांचीही हेराफेरी केली, आता मी..”, भुजबळांचा सरकारला थेट इशारा

Chhagan Bhujbal on Maratha Reservation

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या जीआरमुळे मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. परंतु, या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल, या जीआरमुळे ओबीसींचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तर अतिशय प्रखर शब्दांत या जीआरचा विरोध केले. थेट न्यायालयात आव्हान देण्याचाही इशारा दिला. या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा सूचक इशारा आपल्याच सरकारला दिला.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी होत होती. सरसकट शब्दावर आक्षेप घेतला जाऊ शकतो म्हणून मग हा शब्द काढून शब्दांची हेराफेरी केली गेली आणि द्यायचे ठरवले. म्हणून तर ते (मनोज जरांगे) परत गेले, गुलाल उधळला असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

छगन भुजबळ यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन, मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलनाची तयारी

म्हणून सरकारने नवी तरतूद केली 

सन 2019 च्या आधी राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. गुज्जर समाजाचे आणि जाट समाजाचेही मोर्चे निघाले. यानंतर मोदी सरकारने ईडब्ल्यूएसचा वर्ग निर्माण केला. यात म्हटले आहे की देशातील काही समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. परंतु, ते सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत म्हणून 50 टक्क्यांच्या आरक्षणात येत नाहीत. त्यामुळे या समाजांसाठी ईडब्ल्यूएस वर्ग निर्माण करत आहोत.

सरकारच्या या निर्णयानंतर गुजरात आणि राजस्थानातील आंदोलने थांबली होती. पण त्या दहा टक्क्यांत एकटा मराठा समाजच आठ टक्के आहे. यानंतरही त्यांचा आग्रह आहे की समाजाला आरक्षण पाहिजे. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणखी दहा टक्के आरक्षण दिले. इतके करूनही ते म्हणाले की आम्हाला ओबीसींचे आरक्षण पाहिजे असे छगन भुजबळ यांनी सागितले.

टीका करण्यापूर्वी आजोबांचे मार्गदर्शन घ्या… मराठा आरक्षणावरून मंत्री विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला

मला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं अन्.. 

आता राज्य सरकारने जीआर काढले. जीआर वाचल्यानंतर लक्षात आले की यात गडबड आहे. एक दिवस आध मला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. दोन्ही उपमुख्यमंत्रीही तिथे होते. आता ते सांगतात की आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं की सरसकट हा शब्द काढला आणि हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे ठरले आहे. यानंतर मी म्हणालो की जे कुणबी आहेत त्यांना द्यायला काहीच हरकत नाही पण, भुजबळ यांना विचारून जीआर काढला अशी दिशाभूल करू नका असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube