छगन भुजबळ यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन, मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलनाची तयारी

OBC Movement Against Maratha Reservation GR : महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. (GR) राज्य सरकारने याबाबत जीआर देखील काढला आहे. पण राज्य सरकारच्या या जीआरमुळे ओबीसी नेते नाराज झाले आहेत. ओबीसी संघटनांकडून आज राज्यभरात आक्रमक आंदोलने करण्यात आली.
अनेक ओबीसी संघटनांनी मराठा आरक्षणाच्या या जीआरची होळी केली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शासनाचा हा जीआर फाडून टाकला. ओबीसींचा हा रोष पाहिल्यानंतर आता ओबीसींचे राज्यातील मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेते आणि संघटनांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाच्या नव्या जीआर विरोधात आंदोलनं करणं थांबवा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. ओबीसी समाजाने आक्रमक आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या जीआरमधील काही शब्दांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत अभ्यासकांसोबत आपली चर्चा सुरु आहे. तसंच, या जीआर विरोधात आपण मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत. त्यामुळे या विरोधात कुणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत जीआर देखील काढला आहे. पण राज्य सरकारच्या या जीआरमुळे ओबीसी नेते नाराज झाले आहेत. ओबीसी संघटनांकडून आज राज्यभरात आक्रमक आंदोलने करण्यात आली.
अनेक ओबीसी संघटनांनी मराठा आरक्षणाच्या या जीआरची होळी केली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शासनाचा हा जीआर फाडून टाकला. ओबीसींचा हा रोष पाहिल्यानंतर आता ओबीसींचे राज्यातील मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेते आणि संघटनांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाच्या नव्या जीआर विरोधात आंदोलनं करणं थांबवा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. ओबीसी समाजाने आक्रमक आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या जीआरमधील काही शब्दांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत अभ्यासकांसोबत आपली चर्चा सुरु आहे. तसेच या जीआर विरोधात आपण मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत. त्यामुळे या विरोधात कुणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. माझी या सर्वांना विनंती आहे, आम्ही सर्वजण येथे अनेक जे कायदेतज्ज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना हे सर्व कागदपत्रे देऊन या संदर्भात जे काही संभ्रम आहे, त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत. माहिती घेत आहोत. आवश्यक असेल तर निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करुन कदाचित सोमवार-मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. पण त्या संदर्भात आपल्याला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता भासते. आम्ही सर्वजण मुंबईत वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत”, असंही भुजबळ म्हणाले.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण शांतपणे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात आपली पत्रके देणं आणि ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही, अशी मागणी करा. हे काम अनेकांनी केलं आहे. आणखी काही ठिकाणी हे काम केलं नसेल तर त्यांनी ते करावं. बाकीचे आंदोलनाचे जे प्रकार आहेत, कुणी उपोणष करत आहेत, कुणी शासन निर्णय फाडत आहेत, असं मी पाहतोय. मला असं वाटतं की, तूर्त आपण या सर्व गोष्टी त्वरित थांबवाव्यात, असंही आवाहन भुजबळ यांनी केलं.
आम्ही याचा अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेणार आहोत. ओबीसींचं नुकसान होत असेल, असं आमच्या वकिलांनी सांगितल्यानंतर निश्चितपणे आमची हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे. त्यासाठी दोन दिवस थांबण्याची आवश्यता आहे. आपण सर्वांनी तूर्त शांत राहा. फक्त निवेदन देण्यापलिकडे काही करु नका. उपोषणे सोडावेत. शांततेने आपलं म्हणणं सरकारी दरबारी निवेदनाने द्यावं आणि वाट पाहावे. सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय आपल्यास निश्चितपणे कळवेन”, असा मेसेज छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना दिला आहे.